बापरे ! चादर हातात यावी, तसा डांबरी रस्ता हातात आला अन्...

बापरे ! चादर हातात यावी, तसा डांबरी रस्ता हातात आला अन्…

| Updated on: May 31, 2023 | 8:01 AM

VIDEO | किसने बनाया, ये मुजस्सिमा? चादर हातात यावी तसा डांबरी रस्ता हातात आला, कुठला आहे हा रोड?

जालना : जालन्यातील एक रस्ता सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल हा रोड आहे की पलंगावरची चादर आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडेल. काही लोक हा रस्ता जशी चादर उचलावी तसाच उचलताना दिसताय. या उद्भूत कामावरून किसने बनाया, ये मुजस्सिमा? असं मीम्स व्हायरल झालंय. जालन्यातील अंबड तालुक्यातील हा रस्ता आहे. हस्ते पोखरण कर्जत या रस्याचे सध्या डांबरीकरण सुरूये. हे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून होतंय. मात्र हा रस्ता निकृष्ट होत असल्याचा आरोप करत काही लोकांनी या रस्त्याला भेट दिलीय आणि त्यांना हा व्हिडीओ तयार केलाय. हा रस्ता ९ किलोमीटरचा आहे त्यापैकी ६ किलोमीटरच काम पूर्ण झालंय. बऱ्याच दिवसांपासून मागणी असलेल्या या रस्त्याचं काम सुरू झालं मात्र त्याच्या दर्ज्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. खुशाल सिंग राजपूत या ठेकेदाराने या रस्त्याचं कंत्राट घेतलंय. त्यांच्यामते रस्त्याचं काम दर्जेदार असून सरकारच्या निकषानुसार होतंय. लोकांनी रस्त्याचं काम सुरू असताना तो रस्ता सेट होण्यापूर्वीच तो रस्ता उखडलाय. बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 31, 2023 08:01 AM