Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांकडून धक्काबुक्की :प्रसाद लाड
भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना अटक केले आहे. एकीकडे सर्व राणे समर्थक आक्रमक झाले असून प्रसाद लाड यांनी गंभीर आरोप केले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी नारायण राणे यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय. तसंच राणे यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही लाड यांनी केलाय. राणे जेवण करत असताना पोलिसांनी त्यांचं जेवणाचं ताट खेचण्याचा प्रयत्न केला. तसा एक व्हिडीओ आपण रेकॉर्ड केल्याचं लाड यांनी सांगितलं. इतकंच नाही तर लाड यांनी एक व्हिडीओही दाखवला आहे.
राणे यांना ताटकळत ठेवून कोर्टात हजर करायचं नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा आरोपही लाड यांनी केलाय. पोलिस राणेंसोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. आमदार, खासदार, मंत्री बाजूला ठेवा. पण एका ज्येष्ठ नागरिकांला अशी वागणूक दिली जात आहे, जी चुकीची आहे. राणे यांची अद्याप अटक दाखवण्यात आलेली नाही. त्यांना ताटकळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की राणेंच्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.