हिम्मत असेल तर शिंगावर घ्या, वेळ आणि दिवस कळवा, राणेंचा 'प्रहार' vs ठाकरेंचा 'सामना'!

हिम्मत असेल तर शिंगावर घ्या, वेळ आणि दिवस कळवा, राणेंचा ‘प्रहार’ vs ठाकरेंचा ‘सामना’!

| Updated on: Oct 21, 2021 | 11:55 AM

शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे, अशा शब्दात आजच्या प्रहारमधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर खुलासा केलाय.

हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले. आम्हाला माहिती आहे, कसे केले ते! शिवसैनिक साक्षीदार आहेत. संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात. त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता. आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, ‘साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.’ याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, ‘वा! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.’ त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा. शिवसेना आता वाघ राहिलेली नाही. तिची मांजर, शेळी झाली आहे, अशा शब्दात आजच्या प्रहारमधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर खुलासा केलाय.