आरोग्य राज्यमंत्र्यांकडून ६ महिन्यापूर्वी उद्धाटन पण अजूनही ICU बंद, कुठला आहे प्रकार?
tv9 marathi Special Report | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये आयसीयू युनिटचं उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र अद्याप नाशिकमधील ते ICU युनिट बंदच
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी 6 महिन्यांपूर्वी नाशिकच्या आयसीयू युनिटचं उद्घाटन केलं होतं. मात्र उद्घघाटनाच्या 6 महिन्यानंतरही ते सुरु होऊ शकलं नसल्याचे वास्तव समोर आले आहे. एकीकडे नांदेड रुग्णालयात मृत्यू का झाले? याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी अहवाल मागवला आहे तर दुसरीकडे नाशकात 6 महिन्यांपूर्वी भारती पवारांनीच उद्घाटन केलेल्या लहान मुलांचं आयसीयू युनिट अजूनही सुरु झालेलं नाही. इथं उपकरणं आली आहेत., मात्र लिफ्टचं बांधकाम अडकलंय. विशेष म्हणजे हे युनिट नाशिकच्या सरकारी दवाखान्यात सुरु केलं गेलं आहे. लिफ्ट का सुरु झाली नाही. याबद्दल इलेक्टिशियन्स म्हणताय, दवाखान्याचं वीजबिल थकल्यामुळे इथं वीजेचं कनेक्शन मिळत नाही. याबद्दल वीज अधिकाऱ्यांना विचारल्यावर ते म्हणताय बिल थकल्यामुळे नियमाप्रमाणे नवीन डीपी देऊ शकत नाही. यावर ज्या कक्षाचं आरोग्य राज्यमंत्र्यांनी 6 महिन्यांपूर्वी उद्घाटन केलं, ते येत्या नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल, असे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे आयसीयू युनिट कधी रुग्णांच्या सेवेत येणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.