राज्यभरात अवकाळीचा फेरा अन् बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका

राज्यभरात अवकाळीचा फेरा अन् बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका

| Updated on: Apr 29, 2023 | 8:01 AM

VIDEO | अनेक जिल्ह्यात अवकाळीचा कहर, घराचं छप्पर उडालं तर पीक पाण्यात, शेतमालाचं मोठ नुकसान झाल्यानं बळीराजा संकंटात, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटने बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. काही जणांच्या घरावरचं छप्परं उडालं तर काहींच्या पशुधनाची मोठी हानी झालीय. शेताचं तळं झालंय. वाऱ्यानं घराची दैना तर पीक मातीमोल झाले. अवकाळी पावसानं बळीराजाची दैना उडाली. जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा बळीराजाला मोठा फटका बसलाय. मुक्ताईनगर, बोधवड, जामनेर येथे जोरदार अवकाळी पाऊस झाला केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालांय. संभाजीनगरमध्येही घरांची पडझड झाली. वर्धा जिल्ह्यातही अवकाळीनं कहर केलाय. दोन ठिकाणी वीज कोसळून काहींचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये नायगाव येथे शेकडो घरांचं नुकसान झालं. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने मोठा हाहाकार उडाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. जळगावात ५० कुटुंबापेक्षा जास्त कुटुंबाचा संसार उघड्यावर आलाय. लातूर जिल्ह्यात मोठी गारपीट झाली. गारपीटचा मारा इतका जोरदार होता की, जनावरांना देखील दुखापत झाली. बघा राज्यात कुठे बसला अवकाळीचा तडाखा…

Published on: Apr 29, 2023 08:01 AM