अवकाळीनं चारा खराब अन् जनावरांना मोठा फटका; बघा शेतकऱ्यांची वाताहत
VIDEO | मानवी जीवनाप्रमाणेच अवकाळी पावसाचा फटका जनावरांना, चाऱ्यांची देखील टंचाई अन् शेतकऱ्यांची उडाली दाणादाण
जितेंद्र बैसाणे, Tv9 मराठी, नंदुरबार : अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसान केलं आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांना मोठे नुकसान झालं आहे, तर शेतीपूरक व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना देखील याच्या फटका बसला आहे. शेतीपूरक करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची चाऱ्याची गरज भासत असते, मात्र अवकाळी पावसामुळे चारा खराब होत असून काळा आणि बुरशी लागत आहे. त्यामुळे जनावरांना खाण्यासाठी चाराचे देखील टंचाई येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे. शेतकरी स्वतःच्या पोटाच्या पहिले जनावरांच्या पोटाचे विचार करत असतो, त्यासाठी वर्षभर साठी चारा साठवणूक करून ठेवला होता, आता चाराचे टंचाई निर्माण झाल्याने जनावरांना कसं जगवायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. मानवी जीवनाप्रमाणेच अवकाळी पावसाचा फटका जनावरांना देखील बसणार आहे. शेतकरी आता चारही बाजूने अडचणीत सापडला आहे. मात्र या संकटातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे शासनाने किमान अर्धा खर्च तरी भरून द्यावा अशी मागणी आता शेतकरी बांधव करत आहे.