मतदान ही बदलाची संधी, सर्वांनी मतदान करावे : उत्पल पर्रिकर

मतदान ही बदलाची संधी, सर्वांनी मतदान करावे : उत्पल पर्रिकर

| Updated on: Feb 14, 2022 | 10:31 AM

पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल  पर्रिकर यांनी मतदान केलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर मतदान करावं, असं आवाहन उत्पल पर्रीकर यांच्याकडून मतदारांना करण्यात आलं आहे.

पणजी मतदार संघातून अपक्ष उमेदवार उत्पल  पर्रिकर यांनी मतदान केलं आहे. सर्वांनी लवकरात लवकर मतदान करावं, असं आवाहन उत्पल पर्रीकर यांच्याकडून मतदारांना करण्यात आलं आहे. मतदारांनी मतदानाचा अधिकार वापरावा. मला विजयाची पूर्ण खात्री असून लोकांचा मला पूर्ण पाठिंबा असल्याचं ते म्हणाले. भाजपची टक्कर वाटते का या विषयावर बोलण्यास पर्रिकर यांनी नकार दिला आहे. मी राजकीय काही बोलणार नाही लोकांना फक्त मतदान करा एवढेच सांगेन, असं उत्पल पर्रिकर म्हणाले.