Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर भाजप सोडणार? पणजीतून बाबूश मोंसेरात यांचं नाव निश्चित : सूत्र

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर भाजप सोडणार? पणजीतून बाबूश मोंसेरात यांचं नाव निश्चित : सूत्र

| Updated on: Jan 16, 2022 | 11:33 AM

गोव्यातील पणजी विधानसभा मतदार संघात भाजपने  उत्पल पर्रीकर यांचा दावा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे त्यांची बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी झाल्याचं कळतंय. उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघासाठी हट्टाला पेटले असले तरी पक्षाने बाबूश मोंसेरात यांचे नाव निश्चित केले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

गोव्यातील पणजी विधानसभा मतदार संघात भाजपने  उत्पल पर्रीकर यांचा दावा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे त्यांची बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी झाल्याचं कळतंय. उत्पल पर्रीकर हे पणजी मतदार संघासाठी हट्टाला पेटले असले तरी पक्षाने बाबूश मोंसेरात यांचे नाव निश्चित केले असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत बैठक. गोव्यातील उमेदवार यादीवर होणार शिक्कामोर्तब आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे राज्यात पडसाद उमटले होते. फडणवीस यांच्या प्रतिक्रियेला उत्पल पर्रीकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. भाजपच्या यादीची वाट न पाहाता उत्पल पर्रीकर यांनी स्वतःचा प्रचार सुरु केला आहे. पणजीत घरोघरी जाऊन ते  मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.