Uttar Pradesh मध्ये परिवर्तन होणार, BJP जाणार : Aaditya Thackeray यांचा दावा | Uncut

Uttar Pradesh मध्ये परिवर्तन होणार, BJP जाणार : Aaditya Thackeray यांचा दावा | Uncut

| Updated on: Feb 24, 2022 | 2:55 PM

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackerayउत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर आदित्य ठाकरे यांनी कडाडून टीका केली. उत्तर प्रदेशातील (UP Elections) जनता विद्यमान सरकारच्या नेतृत्वावर समाधानी नसून येथे केवळ दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे. त्यामुळे या राज्यात परिवर्तनाची लाट येणे आवश्यक असून शिवसेनेचे उमेदवार हेच परिवर्तनाचं प्रतीक आहे, असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं. या भाषणात बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला. चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तेव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.

Published on: Feb 24, 2022 02:31 PM