… तर वंचित पूर्ण ४८ जागांवर लढणार? लोकसभेबाबत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य काय?
महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार की नाही. जर आली तर त्यांना किती जागा मिळतील? यावरून चर्चा सुरूये. नेते म्हणताय येत्या काही दिवसात फॉर्म्युल्याचं चित्र स्पष्ट होईल. तर मविआतील चर्चेत असणाऱ्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गट २०, काँग्रेस १६, शरद पवार गट १० आणि वंचितला २ जागा मिळतील अशा चर्चा
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : लोकसभेसाठी वंचित आघाडीने स्वतःपुढे तीन पर्याय ठेवले आहेत. तर दुसरीकडे येत्या काही दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होऊन प्रकाश आंबेडकर आणि आमची भूमिका एकच राहिल असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये वंचित येणार की नाही. जर आली तर त्यांना किती जागा मिळतील? यावरून चर्चा सुरूये. नेते म्हणताय येत्या काही दिवसात फॉर्म्युल्याचं चित्र स्पष्ट होईल. तर मविआतील चर्चेत असणाऱ्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गट २०, काँग्रेस १६, शरद पवार गट १० आणि वंचितला २ जागा मिळतील अशा चर्चा आहे. तर वंचितने १० जागांहून अधिक जागांची मागणी केली आहे. पण दिल्लीत सर्वपक्षांच्या सहमती जागा वाटपाचा निर्णय होणार असल्याचे नेते म्हणताय. तर दुसरीकडे यामध्ये एकमत नाही झाल्यास ठाकरे आणि आम्ही निम्मे निम्मे जागा लढवू किंवा तेही शक्य नाही झाल्यास आम्ही पूर्ण ४८ जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.