आनंदाची बातमी! यंदा मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार? काय आहे कारण?

आनंदाची बातमी! यंदा मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार? काय आहे कारण?

| Updated on: Jul 26, 2023 | 12:11 PM

VIDEO | गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकर सुखावणार? काय आहे आनंदाची बातमी?

मुंबई : संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावासंदर्भात मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाकडून मुंबईकरांसाठी चांगली आणि आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव सध्या ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा विहार तलाव पूर्णपणे भरुन वाहत आहे. त्यामुळे यंदा मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव मध्यरात्री पूर्णपणे भरुन वाहू लागला आहे. पवईमध्ये असलेला हा विहार तलाव सध्या ओव्हर फ्लो होऊन वाहत असल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याचदरम्यान तानसा धरण परिसरातही सातत्याच्या पावसामुळे धरण भरून ओव्हर फ्लो झाले आहे. ज्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेचे कारणच आता संपले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या तानसा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने धरण पुर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले आहे.

Published on: Jul 26, 2023 12:00 PM