Vijay Wadettiwar | ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव : विजय वडेट्टीवार
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या वागण्यातून ते ओबीसी आरक्षण विरोधी असल्याची टीका त्यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षण देण्याची केंद्राची भूमिका नाही, असा घणाघात ओबीसी नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसींच राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह संवादा दरम्यान म्हटलं. ‘अनुसुचीत जाती आणि जमाती सोडून कुठल्याही जातीची जातीनुसार जनगणना होणार नाही, केंद्राकडे असेलला डाटाही देणार नाही’, असं लेखी उत्तर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॅाय यांनी काल दिलं होतं. त्यावर बोलताना वडेट्टीवारांनी हे उत्तर दिलं.
Published on: Jul 21, 2021 01:47 PM
Latest Videos