Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम, विश्वविक्रमानंतर विराट म्हणाला, अनुष्का होती... सचिन पाज्जी...

Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम, विश्वविक्रमानंतर विराट म्हणाला, अनुष्का होती… सचिन पाज्जी…

| Updated on: Nov 16, 2023 | 11:53 AM

वानखेडे स्टेडिअमवर विराट कोहलीची ११७ धावांची तुफान खेळी पाहायला मिळाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यानंतर आणि केलेल्या या विश्वविक्रमानंतर विराट कोहलीनं दिली पहिली प्रतिक्रिया. म्हणाला...हे सगळं स्वप्नवत आहे. वास्तवात जुळून आलं. अनुष्का इथं होती. सचिन पाज्जी..

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ : विराट कोहली यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. न्यूझीलंडसोबत झालेल्या सामन्यात विराट कोहलीनं ५० वं शतक केलं आहे. तर विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला असल्यानं त्याचंही तितकंच कौतुक देशभरातून केलं जात आहे. वानखेडे स्टेडिअमवर विराट कोहलीची ११७ धावांची तुफान खेळी पाहायला मिळाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडल्यानंतर आणि केलेल्या या विश्वविक्रमानंतर विराट कोहलीनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सगळं स्वप्नवत आहे. वास्तवात जुळून आलं. अनुष्का इथं होती. सचिन पाज्जी स्टेडिअममध्ये होते. माझी जीवनसाथी, माझा हिरो आणि वानखेडेचे हे सगळे क्रिकेट चाहते… हे सगळं शब्दांत मांडणं कठीण आहे. पण मी सुंदर चित्र रेखाटू शकत असतो तर कदाचित ते असंच असतं’

Published on: Nov 16, 2023 11:53 AM