कमला एकादशीनिमित्तानं सावळ्या विठूरायाचं मंदिर २ टन फुलांनी सजलं, बघा गाभाऱ्यातील सजावट

कमला एकादशीनिमित्तानं सावळ्या विठूरायाचं मंदिर २ टन फुलांनी सजलं, बघा गाभाऱ्यातील सजावट

| Updated on: Jul 29, 2023 | 12:14 PM

VIDEO | कमला एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सजलं, बघा गाभाऱ्यातील मनमोहक सजावट अन् विठुरायाचं लोभस रूप

पंढरपूर, 29 जुलै 2023 | आज अधिक महिन्यातील कमला एकादशीनिमित्त १५ प्रकारच्या दोन टन विविध रंगी फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजवले आहे. आज तीन वर्षातून एकदा येणाऱ्या पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यानी केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा, सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यू डिजे ,पिवळा झेंडु, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकीड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी विठुरायाचा गाभारा उजळून निघाला आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे.

Published on: Jul 29, 2023 12:14 PM