ठरलं… लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.मात्र विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी यावेळी विविध शिक्षक संघटनांनी केली होती.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदार होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात १० जूनला मतदान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आयोगाकडून राज्यातील चार जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र विविध शिक्षक संघटनांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १० जूनला होणारी पदवीधर निवडणूक १५ जूननंतर घेण्याची मागणी यावेळी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. ही मागणी लक्षात घेता निवडणुका २६ जून रोजी होणार आहेत.
Published on: May 24, 2024 03:20 PM
Latest Videos