Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा हैदोस, बळीराजा हवालदिल, IMD कडून मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
बुलढाणा येथे गारपीट आणि वादळी वाऱ्याने पपईची बाग जमीनदोस्त झाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. तर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरीने बरसल्याचे पाहायला मिळत आहे. पाच ते सात एप्रिलदरम्यान, मुंबईमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मुंबईसाठी पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचे असणार असून काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले असतना शेती पिकाचं मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. अशातच हवामान विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्याना यसो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील २४ तासात पावसाचे सावट गायब होऊन तापमाात वाढ होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न

भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं

पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला

MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
