मोठी बातमी ! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात, प्रकृतीबाबत अपडेट समोर
ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपवून ममता दीदी कलकत्त्याला परतत असताना हा अपघात झाला
कलकत्ता, २४ जानेवारी २०२४ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहेच. ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपवून ममता दीदी कलकत्त्याला परतत असताना हा अपघात झाला. कार चालकाने अचानक ब्रेक मारल्याने त्यांच्या डोक्याला किरकोळ अशी दुखापत झाली. यानंतर ममता दीदींना SSKM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. वर्धमान येथे असलेल्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी या एका सार्वजनिक कार्यक्रमाला जाणार होत्या. तिथून त्या हेलिकॉप्टरने कलकत्त्याला परतणार होत्या. पण हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरने न जाता रस्ते मार्गाने कलकत्ता येथे परतण्यास निघाल्या असताना हा अपघात झाला.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..

