लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधेयक मंजूर, पण अंमलबजावणी कधी?
tv9 Special Report | भविष्यात या विधेयकाच्या मंजुरीनंतर संसदेतल्या महिला खासदारांची संख्या 180 हून जास्त होणार, लोकसभेत आज बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधायक मंजूर झाले पण अंमलबजावणी कधी?
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | लोकसभेत बहुप्रतिक्षीत महिला आरक्षण विधेयक आज मंजूर करण्यात आलं आहे. भविष्यात या विधेयकाच्या मंजुरीनंतर संसदेतल्या महिला खासदारांची संख्या 180 हून जास्त होणार आहे. मात्र याची अंमलबजावणी कधीपासून होईल. येत्या 2024 च्या निवडणुकीपासून की मग 2029 च्या निवडणुकीनंतर याची चर्चा आता सुरू झाली आहे. मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ आरक्षणाचं विधेयक आणलं. सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनीही स्वागत केलंय. संसदेची दोन्ही सभागृहांत महिलांना 33 टक्के आरक्षण लागू असणार आहे. सर्व विधानसभांवरही महिलांसाठी 33 टक्के जागा असतील तर 128 व्या घटनादुरुस्तीनुसार हे आरक्षण 15 वर्षांसाठी लागू असणार आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Sep 19, 2023 11:47 PM
Latest Videos