… तुम्ही काय शिकवणार? शिक्षक भरती रखडल्याच्या मुद्द्यावर जाब विचारणाऱ्या महिलेवर शिक्षणमंत्रीच भडकले
शिक्षण मंत्री आणि भावी शिक्षकेची जुंपली असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर बीड दौऱ्यावर असताना एका महिला शिक्षिकेने केसरकर यांना रखडलेल्या शिक्षक भरतीवरून थेट जाबच विचारला.
मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : राज्यातील शिक्षक भरतीवरून एका भावी शिक्षक महिलेने थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनाच जाब विचारल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर शिक्षण मंत्री आणि भावी शिक्षकेची जुंपली असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर बीड दौऱ्यावर असताना केसरकर माध्यमांशी बोलत असताना एका महिला शिक्षिकेने केसरकर यांना रखडलेल्या शिक्षक भरतीवरून थेट जाबच विचारल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केसरकर त्या महिलेवरच भडकले. केसरकर म्हणाले, ‘मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर बेशिस्त असाल तर तुम्ही सरकारी नोकरीत येऊ शकत नाही. तुम्ही कशा मुलांना शिकवणार आहात?’ ,असा सवालच त्या महिलेला त्यांनी केला. साईट ओपन झाली आहे, भरती सुरु आहे, मग तुम्ही कशा आला मला विचारायला. आजपर्यंत पाच वर्षात कुणी भरती केली? मी केली ना, असेही केरसरकर यांनी त्यांना सुनावले.