टेरर फंडिग प्रकरण: जन्मठेप! लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला शिक्षा

टेरर फंडिग प्रकरण: जन्मठेप! लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला शिक्षा

| Updated on: May 25, 2022 | 6:47 PM

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं (Patiyala House Court) यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

नवी दिल्ली : संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या टेरर फंडिग (Terror Funding) प्रकरणात जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिकला (Yasin Malik) शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिग प्रकरणात दोषी आढळलेला JKLF प्रमुख यासिन मलिकला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. यासिन मलिकला कलम 120 नुसार 10 वर्षे कारावास आणि कलम 121 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासिनची रवानगी आता तिहार जेलमध्ये होणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं (Patiyala House Court) यासिन मलिकला शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली होती.

Published on: May 25, 2022 06:47 PM