Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू चॅम्पियन, जपान गाजवून ये, तिरंदाज Pravin Jadhav ला पंतप्रधान Narendra Modi यांनी दिल्या शुभेच्छा

| Updated on: Jul 13, 2021 | 8:53 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवशी बोलताना मोदीजींनी चक्क मराठीत त्याची विचारपूस केली.

नवी दिल्ली : लवकरच टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांना जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. या स्पर्धांसाठी सर्व देश आपले आघाडीचे खेळाडू पाठवत आहेत. भारताचे शिलेदारही टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympics) 17 जुलैला रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सीगद्वारे खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधवशी बोलताना मोदीजींनी चक्क मराठीत त्याची विचारपूस केली.