VIDEO : Yavatmal | यवतमाळमधील तरुणाचं मोदींना लग्नाचं निमंत्रण, मोदींनी दिल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद

| Updated on: Dec 23, 2021 | 1:21 PM

यवतमाळ  जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत.

यवतमाळ  जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत. ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र 22 डिसेंबर मिळाले असून तेंव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

आदित्य ठाकरेंना धमकी, गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत – मलिक
VIDEO : जितेंद्र आव्हाडांची संस्कृती बाप काढण्याची आहे, Chandrakant Patil यांचा आव्हाडांवर हल्लाबोल