Gunaratna Sadavarte : मराठा तरुण आक्रमक, गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड
VIDEO | मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांच्या अल्टिमेटमनंतर सरकारने कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसलेत, यावेळी जरांगे पाटील युवकांना संयम ठेवण्याचे आवाहन करत आहे. मात्र आज काही आक्रमक तरूणांनी गुणरत्न सदावर्तेंना दणका दिलाय
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज मराठा आरक्षण मिळेल या आशेने अद्याप संयम ठेवून असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मनोज जरांगे पाटील हे देखील वारंवार मराठा समाजातील तरूणांना कोणतेही तीव्र आंदोलन करू नका, संयम राखा अशी विनंती करत आहे. मात्र आज मुंबईत मराठा समाजातील तरूणांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. मराठा क्रांती मोर्चाच्या काही तरूणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची मोठी तोडफोड केली आहे. आज सकाळच्या दरम्यान, सदावर्ते यांच्या घराच्या दिशेने मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत क्रिस्टल टॉवर येथील पार्किंगमध्ये असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील केल्या. एकूण तीन तरूणांनी सदावर्तेंच्या दोन्ही गाड्यांची तोडफोड केली. तर पोलिसांनी या तिन्ही तरुणांना रोखत त्यांना अटक केली आहे.