नांदेडमध्ये झेंडूच्या फुलबागा बहरल्या.. शेतकऱ्यांना चांगल्या दराची प्रतीक्षा
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु झाला आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा सणासाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले मोठया प्रमाणात फुलवलीत. नांदेडच्या अर्धापुर, मुदखेड आणि उमरी तालुक्यात झेंडू फुलांच्या बागा बहरलेल्या दिसतायत.
सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु झाला आहे. नवरात्रोत्सव आणि दसरा सणासाठी फुल उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडूची फुले मोठया प्रमाणात फुलवलीत. नांदेडच्या अर्धापुर, मुदखेड आणि उमरी तालुक्यात झेंडू फुलांच्या बागा बहरलेल्या दिसतायत. सध्या झेंडू फुलाला चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांना रविवारी येणाऱ्या गौरी स्थापनेची प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर आगामी काळात येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी देखील शेतकऱ्यांनी फुले राखून ठेवलीयत. सद्यस्थितीत मंदिरे बंद असल्याने मात्र फुल उत्पादक शेतकऱ्यांना म्हणावा तसे उत्पन्न होत नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांमध्ये तरी झेंडूच्या फुलांना चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Latest Videos