AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही चित्रपट यशस्वी होतात काही नाही, मी Box Office वर चालेल म्हणून चित्रपट बनवत नाही-Nagraj Manjule

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 9:08 PM
Share

झुंडकडून बॉक्स ऑफिसवर जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली का, असा प्रश्न विचारला असता बॉक्स ऑफिसचा विचार करून मी फिल्म करत नसल्याचं नागराज यांनी स्पष्ट केलं. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते चित्रपटाविषयीच्या विविध बाबींवर व्यक्त झाले.

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर साडेसहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. झुंडकडून बॉक्स ऑफिसवर जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली का, असा प्रश्न विचारला असता बॉक्स ऑफिसचा विचार करून मी फिल्म करत नसल्याचं नागराज यांनी स्पष्ट केलं. ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते चित्रपटाविषयीच्या विविध बाबींवर व्यक्त झाले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरील विविध पोस्टवरही प्रतिक्रिया दिली. “सोशल मीडियावर काळं-पांढरं करून दाखवतात, ते मला आवडत नाही”, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.