भाजपच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब, तिकीटं जाहीर होण्यात दिरंगाई

भाजपही यादी जाहीर करुन लगेचच उमेदवरांना एबी फॉर्म वाटण्याची चिन्हं आहेत. भाजपने विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याचीही माहिती आहे.

भाजपच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब, तिकीटं जाहीर होण्यात दिरंगाई
Follow us
| Updated on: Sep 30, 2019 | 8:13 AM

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी (BJP Candidate List delayed) आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत काल (रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. रविवारी रात्री उशिरापर्यंत यादी जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र आता भाजप सोमवारी उमेदवारांना तिकीटवाटपाची घोषणा करणार असल्याचं दिसत आहे.

युतीची घोषणा होणार, हे निश्चितपणे सांगणारे शिवसेना आणि भाजपचे नेते घोषणेचा मुहूर्त मात्र सांगत नाहीत. एकीकडे शिवसेनेने 25 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत. आता भाजपही यादी (BJP Candidate List delayed) जाहीर करुन लगेचच उमेदवरांना एबी फॉर्म वाटण्याची चिन्हं आहेत. भाजपने विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याचीही माहिती आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादीने बीडमधील उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी मिळवली. तर वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, आप यासारख्या पक्षांनीही तिकीटवाटप केलेलं आहे.

शिवसेनेचे उमेदवारही ठरले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादीही ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती लागली आहे. शिवसेनेने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याआधीच रविवारी एबी फॉर्मचं वाटप केलं. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संबंधित उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केलं. शिवसेना-भाजप युती जाहीर होण्याआधीच शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयाची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली.

काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

ज्या मतदारसंघाबाबत युतीत अगदी स्पष्टता आहे आणि पक्षांतर्गतही ज्या जागांवर काहीही वाद नाही, अशा बहुतांश मतदारसंघातील उमेदवारांना शिवसेनेने एबी फॉर्मचं वाटप केलं.

शिवसेनेचे संभाव्य उमेदवार

आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)

अजय चौधरी – शिवडी (मुंबई)

यामिनी जाधव – भायखळा (मुंबई)

प्रकाश सुर्वे – मागाठणे (मुंबई)

सदा सरवणकर – माहिम (मुंबई)

सुनिल प्रभू – दिंडोशी (मुंबई)

बालाजी किणीकर – अंबरनाथ (ठाणे)

गौतम चाबुकस्वार – पिंपरी (पुणे)

विजय शिवतारे – पुरंदर (पुणे)

अनिल कदम – निफाड (नाशिक)

योगेश घोलप – देवळाली (नाशिक)

राजाभाऊ वाजे – सिन्नर (नाशिक)

संग्राम कुपेकर – चंदगड (कोल्हापूर)

सुजित मिणचेकर – हातकणंगले (कोल्हापूर)

राजेश क्षीरसागर – कोल्हापूर उत्तर (कोल्हापूर)

अनिलराव बाबर – खानापूर-आटपाडी (सांगली)

उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)

भास्कर जाधव – गुहागर (रत्नागिरी)

योगेश कदम – (रामदास कदम यांचे सुपुत्र) दापोली (रत्नागिरी)

राजन साळवी – राजापूर (रत्नागिरी)

सदानंद चव्हाण- चिपळूण (रत्नागिरी)

दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

वैभव नाईक – कुडाळ (सिंधुदुर्ग)

संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)

संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम (औरंगाबाद)

अर्जुन खोतकर – जालना (जालना)

संतोष बांगर – कळमनुरी (हिंगोली)

विश्वनाथ सानप – रिसोड (वाशिम)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना अर्ज देत आहेत आणि ते क्षण कॅमेरात टिपले जात आहेत.यावरुन उमेदवार निवडण्यावर यंदा पूर्णपणे उद्धव ठाकरे यांचंच नियंत्रण असल्याचं स्पष्ट होतं.

AB फॉर्मचं वाटप हे पूर्वी पक्षाचे सचिव किंवा नेते मंडळी करत असत. AB फॉर्म मातोश्री, सेनाभवन किंवा शिवालय यापैकी कुठेही उमेदवाराला बोलवून दिला जात असे. यंदा त्या पद्धतीला उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे बगल दिली आहे.

AB फॉर्म देताना फोटोमध्ये उद्धव ठाकरे, संबंधित उमेदवाराच्या पाठी बाळासाहेबांचा फोटो असेल याची काळजी घेतली गेली आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.