अपक्ष मेहुण्याविरोधातील भाचीला निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने विखे कात्रीत

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांची भाची म्हणजेच भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात विखेंचे मेहुणे राजेश परजणेही निवडणूक लढवत आहेत.

अपक्ष मेहुण्याविरोधातील भाचीला निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने विखे कात्रीत
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 2:05 PM

शिर्डी : भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाची अर्थात कोपरगावमधील भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आश्वासन (Kopargaon Vidhansabha Election) दिलं आहे. मात्र त्याच मतदारसंघात विखेंचे मेहुणेही अपक्ष उभे असल्यामुळे त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, भाचीला मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असा सूचना वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांना दिला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात भाची अर्थात भाजप उमेदवार असलेल्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठीशी उभे राहणार असं आश्वासन दिलं. तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनीही विखे पाटलांना कोल्हे यांना मोठ्या मताधिक्क्याने (Kopargaon Vidhansabha Election) निवडून आणण्याची जबाबदारी दिली. भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलं.

दुसरीकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे हे स्नेहलता कोल्हे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. विखेंनी भाची मागे उभं राहणार असं आश्वासित केलं खरं, मात्र भाजप उमेदवार असलेल्या भाचीला मदत करायची की मेहुण्याला अशा कात्रीत विखे सापडले आहेत.

कोण आहेत राजेश परजणे?

राजेश परजणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे यांचे धाकटे बंधू आहेत. राजेश परजणे यांच्याकडे गोदावरी दूध संघाचं अध्यक्षपद आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या तिकीटावर शिंगणापूरमधून ते निवडून आले आहेत. भाजपकडून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक

कोपरगाव विधानसभेत स्नेहलता कोल्हे (भाजप), आशुतोष काळे (राष्ट्रवादी), अशोक विजय गायकवाड (वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत) आणि दोघा अपक्ष उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.