Mango: फळांचा ‘राजा’ निघाला अमेरिकेच्या वारीवर, कशामुळे रखडली होती निर्यात? वाचा सविस्तर

यंदा अनेक संकटावर मात करीत गतमहिन्यातच फळांचा राजा डौलत मुंबई बाजारपेठेत दाखल झाला होता. देशाअंतर्गत बाजारपेठेत तर निर्यातीचा मार्ग खुला झाला होता. पण परदेशातील खवय्ये गेल्या दोन वर्षापासून या रसाळ आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले होते. अखेर दोन वर्षानंतर फळांचा राजा हापूस हा अमेरिकेच्या वारीवर जाणार आहे.

Mango: फळांचा 'राजा' निघाला अमेरिकेच्या वारीवर, कशामुळे रखडली होती निर्यात? वाचा सविस्तर
देवगड हापूसचे महत्व कायम रहावे म्हणून आता खरेदी केंद्रवर शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 1:08 PM

रत्नागिरी : यंदा अनेक संकटावर मात करीत गतमहिन्यातच (Hapus Mango) फळांचा राजा डौलत मुंबई बाजारपेठेत दाखल झाला होता. देशाअंतर्गत बाजारपेठेत तर (Export) निर्यातीचा मार्ग खुला झाला होता. पण परदेशातील खवय्ये गेल्या दोन वर्षापासून या रसाळ आंब्याच्या चवीपासून वंचित राहिले होते. अखेर दोन वर्षानंतर फळांचा राजा हापूस हा अमेरिकेच्या वारीवर जाणार आहे. निर्याती संबंधीच्या सर्व अडचणी दूर झाल्या असून अमेरिकेतील ग्राहकांना दोन वर्षानंतर हापूसची चव चाखता येणार आहे. ज्याप्रमाणे देशातील (Main Market) मुख्य बाजारपेठेतील ग्राहक हापूसची आतुरतेने वाट पाहत असतात अशीच स्थिती अमेरिकेतही असते पण कोरोनाच्या प्रतिकूल परस्थितीमुळे निर्यात ही रोखण्यात आली होती अखेर अमेरिकेतील कृषी विभागाने आयातीस परवानगी दिल्याने निर्यातीचा मार्ग खुला झाला असल्याचे आंबा बागायत संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आंबा निर्यातीचा दुहेरी फायदा..

ज्याप्रमाणे हापूस आंब्याला राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये मागणी असते अगदी त्याचप्रमाणे अमेरिकेतील ग्राहकही या आंब्याची वाट पाहतात. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे ही निर्यात बंद होती. अखेर केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याने निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण आता बाजारपेठेतील दर आणि निर्यातीला मिळालेली परवानगी यामुळे परकीय चकनाचा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. वाढत्या मागणीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी उत्पन्न वाढवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालेली आहे.

यामुळे बंद होती निर्यात

दरवर्षी देशातून जवळपास 1 हजार टन आंबा हा अमेरिकेत निर्यात होत असतो. यामध्ये 300 टन तर हापूस आंबाच असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार या भागातील आंबा निर्यात ही बंद होती. कारण अमेरिकेती कृषी विभागातील निरीक्षकांना या आंब्यावरील विकिरण सुविधांची तपासणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे 2020 पासून निर्यातीवर निर्बंध लादण्यात आले होते. मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष निर्यातीला सुरवात होणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असा सुटला निर्यातीचा प्रश्न

आंबा निर्यातीसाठी अमेरिकेच्या कृषी विभागाची परवानगी गरजेची असते. मात्र, कोरानामुळे निर्यातीला परवानगीच मिळत नव्हती. परंतू, नोव्हेंबर 2021 मध्ये भारत-अमेरिका व्यापार मंचाची बैठक पार पडली आणि यामध्ये दोन्ही देशातील शेतीमालाच्या निर्यात-आयातीचे धोरण ठरवण्यात आले होते. या करारानुसार आता देशातून आंबा, डाळिंब याची निर्यात होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार आहे कारण हापूसची सर्वाधिक निर्यात ही महाराष्ट्रातूनच होत असते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या फळबागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या  :

शेतीमालाच्या दराला उतरती कळा, त्यात व्यापाऱ्यांचा अजब कारभार, नेमके काय झाले खामगाव बाजार समितीमध्ये?

Natural Crisis: निसर्गाचा लहरीपणा त्यात कृषी विभागाची अनास्था, जगाचा पोशिंदा मात्र वाऱ्यावर

Cilantro : पारंपारिक पिकांना कोथिंबीर भारी, बुरशीचा नायनाट अन् उत्पन्नात भर

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.