AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

Budget 2022 : शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची शक्यता, पायाभूत सुविधांचा विकास, निर्यातीला प्रोत्साहन मिळणार?
शेतकरी (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 6:47 AM
Share

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजाराप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल घडवावेत यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सादर करत असलेल्या या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी (Agriculture Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी गुंतवणूक योजना जाहीर केली जाऊ शकते. शेतकऱ्यांना यासाठी अनुदान देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार सरकार शेत मालाचे मूल्यवर्धन आणि बॅकवॉर्ड लिंकेजेस यांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी गुंतवणुकीचं सहाय्य करण्याची शक्यता आहे. यामुळे देशात शेतकऱ्यांना निर्यात करण्यासाठी मदत होईल आणि बाजारात शेतमाल पोहोचवण्यासाठी देखील सुलभता येईल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अन्नप्रक्रिया उद्योगावर विशेष नजर

सरकार विविध प्रकारच्या शेतमालाच्या उत्पादनाच्या निर्यातीसाठी वाहतूक, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करू शकतं. सरकारनं गेल्या वर्षी सहकार मंत्रालयाची मोठी घोषणा केली होती. सहकार मंत्रालयाला आर्थिक ताकद देण्याचा निर्णय देखील या बजेटमध्ये होऊ शकतो. अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सरकारनं पहिल्यांदा 10900 कोटी रुपये प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह योजना जाहीर केलेली आहे. या क्षेत्रात साठवणूक, वाहतूक सोयीसुविधा यांना प्रोत्साहन देण्यासाठी अजून एका वेगळ्या पीएलई योजना घोषित होण्याची शक्यता आहे. शेती क्षेत्रातील एकूण सकल उत्पादनात 11.1 38 टक्के हिस्सा हा अन्नप्रक्रिया उद्योगातून येतो. सरकार अन्नप्रक्रिया उद्योगासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एका पिकावरील अवलंबित्व कमी करणार

इक्रा या संस्थेच्या अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी आपण तांदूळ निर्यातीवरील भर कमी करून कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन आणि ते निर्यात केल्यास ते अधिक टिकावू आणि फायदेशीर ठरेल असे म्हटलंय. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांचं एका पिकावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे, असे देखील म्हटले आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज आणि प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं, असं तज्ञांचे मत आहे. कृषी उत्पादनांसाठी स्थानिक बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहून धोरण ठेवले पाहिजे ,असे देखील अर्थतज्ज्ञांनी सूचवलं आहे. साठवणूक आणि वाहतुकीच्या सोयीमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावं, असं देखील अर्थतज्ज्ञांना वाटतं.

इतर बातम्या:

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद

Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, कोणत्या भागात पुरवठा बंद, घ्या जाणून!

Agriculture budget 2022 Narendra Modi government can announce sops for food processing sector in union budget by Nirmala Sitharaman

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.