Mango : फळांचा राजा बाजारपेठेतून गायब, महिन्याभराच्या सिझनमध्ये उत्पादकांच्या पदरी काय ?
अवकाळी पाऊस, कडाक्याचे ऊन आणि गराठा अशा सर्वच ऋतुचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबरच आंब्याचा दर्जाही ढासळला आहे. उत्पादन घटल्याने यंदा मागणीत वाढ होणार हे साहजिकच होते. आंब्याची नियमित आवक महिन्याभरच राहिली असे असातानीही वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.
मुंबई : उशिरा का होईना फळांचा राजा मोठ्या दिमाखात बाजारपेठेमध्ये दाखल झाला पण केवळ महिन्याभरासाठीच. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट तर झालीच पण त्यामध्ये अनियमितताही आढळून आली आहे. हापूस आंबा बाजारपेठेत खऱ्या अर्थाने दाखल झाला तो अक्षयतृतेयानंतरच. असे असतानाही उत्पादनात घट झाल्याने सध्या आंब्याची आवक घटली आहे. त्यामुळे राज्यातील मुख्य बाजारपेठेतून आंबा हा गायब झाला आहे. यंदा आंब्याचा हंगाम अल्पावधीचा राहिला असला तरी वाढीव दरामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीला मुंबई मार्केटमध्ये केवळ रायगड जिल्ह्यातून आंब्याची थोड्याबहुत प्रमाणात आवक सुरु आहे.
हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात वाढ
अवकाळी पाऊस, कडाक्याचे ऊन आणि गराठा अशा सर्वच ऋतुचा आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबरच आंब्याचा दर्जाही ढासळला आहे. उत्पादन घटल्याने यंदा मागणीत वाढ होणार हे साहजिकच होते. आंब्याची नियमित आवक महिन्याभरच राहिली असे असातानीही वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. अल्पावधीचा हंगाम पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने महत्वाचा राहिला आहे.सध्या सर्वच भागातून आवक घटली असाताना त्याचा दरावर परिणाम होणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
आता खवय्यांसाठी गुजरातचा आंबा
अल्पावधीतच आंब्याची आवक घटली आहे. उत्पादनावरील परिणाम सध्या बाजारपेठेत जाणवत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंब्याची आवक घटली आहे. त्याचा परिणाम आता दरावर होत असून खवय्यांसाठी आता गुजरातहून दाखल होणाऱ्या आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मागील वर्षापेक्षा यावेळी 20 ते 25 टक्के भाव जास्त राहिले. त्यामुळे आंबा खवय्यांच्या खिशाला शेवटच्यावेळी कात्री लागली. गुजरातमधून आंब्याची आवक वाढली तरच ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे दर मिळणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील आवकवर बाजारपेठ
राज्यातील मुख्य बाजारपेठेमध्ये सध्या आंब्याची आवक ही रायगड जिल्ह्यातून होत आहे. ही आवक देखील आता चार दिवसांमध्ये संपेल असे व्यापारी सांगत आहेत. यंदा आंब्याची आवक ही काही काळापूरतीच मर्यादित राहिली असली तरी शेतकऱ्यांसाठी ती महत्वाची होती. शिवाय निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी परकीय चलनही पडले आहे. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.