Central Government : मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार
आता दोन किटकनाशके ही मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन यांचा समावेश आहे. टोमॅटो आणि सफरचंदाच्या संरक्षणासाठी या कीटकनाशकांचा वापर केला जात होता.
मुंबई : नैसर्गिक शेतीच्या अनुशंगाने (Central Government) केंद्र सरकार पावले उचलत आहे. या शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी एक ना अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहे तर दुसरीकडे रासायिनक शेती क्षेत्र कमी व्हावे यासाठीही निर्णय घेतले जात आहेत. आता ( Pesticides) दोन किटकनाशके ही मानवी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन यांचा समावेश आहे. टोमॅटो आणि सफरचंदाच्या संरक्षणासाठी या कीटकनाशकांचा वापर केला जात होता. त्यामुळे आता भारतीय कंपन्यांना 2024 नंतर ही दोन कीटकनाशके विकता येणार नाहीत. या दोन्ही रसायनांमध्ये पिकांचा संसर्ग रोखण्याची क्षमता आहे. परंतु, त्यांच्या फवारणीनंतर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे समोर आले होते.
आता परिणामकारक किटकनाशकांवर बंदीच
केंद्र सरकारने यापूर्वी 27 कीटकनाशके धोकादायक बनवून त्यांच्यावर बंदी घातली होती. पण अद्यापही बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. त्यानंतरही या कीटकनाशकांच्या परिणामाचा आढावा घेतला जात आहे. आता जर कोणती किटकनाशके ही सरकारला मानवी आरोग्यासाठी धोकादायक वाटत असेल, तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येणार आहे. सध्या दोन नवीन कीटकनाशकांवरील बंदी चा मुद्दा चर्चेत आहे.
काय आहे सरकारचे म्हणणे…?
स्ट्रेप्टोमायसिन आणि टेरासायक्लिन नावाच्या कीटकनाशकांच्या आयात आणि उत्पादनावर 1 फेब्रुवारी 2022 पासून बंदी घालण्यात येईल, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. ज्या कंपन्यांनी कच्चा माल मागवला आहे त्यांना जुना साठा रिकामा करण्यासाठीची वेळ दिला जाईल. या दोघांमधील व्यापार करणाऱ्या कंपन्या 31 जानेवारी 2022 पर्यंत आपली उत्पादने विकू शकतील. हे बुरशीजन्य व जीवाणू वनस्पती रोग नियंत्रक आहेत.
कंपन्यांकडून सरकारचीही दिशाभूल
सुरवातीला ही दोन्हीही किटकनाशके ही केवळ बटाटा आणि तांदळासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात टोमॅटो आणि सफरचंद यांसारख्या उच्च वापराची फळांवर फवारण्यासाठी याचा वापर केला जात होता. या किटकनाशकांच्या फवारणीचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने 2020 मध्ये दोन्ही रसायनांवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानुसार हा निर्णय झाला आहे.
बासमती तांदळावरील किटकनाशकांवरही घालण्यात आली बंदी
किटकनाशकांमध्ये निर्धारीत प्रमाण नसल्यावरही त्याचा परिणाम हा शेती पिकावर होत असतो. बासमती तांदळासाठी वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकामध्ये हे प्रमाण कमी-जास्त होते. त्यामुळे पंजाब सरकारने बासमती धान लागवडीत वापरल्या जाणाऱ्या 12 कीटकनाशकांवर बंदी घातली होती. युरोप आणि इतर देशांमध्ये तांदळाची निर्यात करणे कठीण जात होते. भविष्यात बासमती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लक्षात घेता त्या कीटकनाशकांवर काही दिवसबंदी घालण्यात आली.