…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?
राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विम्याचे पैसे अदा केले आहेत. आता सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन इतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनीने आतापर्यंत एक नया पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. अशीच परस्थिती राहिली तर विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढतच जाईल. अशा आशयाचे पत्र कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्र सरकारला लिहले होते.
लातूर : राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (Reliance General Insurance Insurance Company) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पीक विम्याचे पैसे अदा केले आहेत. आता सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन इतर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनीने आतापर्यंत एक नया पैसाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. अशीच परस्थिती राहिली तर विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष वाढतच जाईल. अशा आशयाचे पत्र (Agriculture Commissioner) कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केंद्र सरकारला लिहले होते.
आता त्यांचे हे भाकीत खरे होताना दिसत आहे. कारण रिलायन्स विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या विरोधात गुन्हे नोंद होण्याचे सत्र हे सुरुच आहे. आता कृषी विभागानेच विमा कंपनीच्या दोन प्रतिनीधींविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बुलडाणा येथेही शेतकऱ्यांची फसवणूक
एकीकडे केंद्र सरकार आणि विमा कंपनीच्या वादामुळे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विमा अनुदानाचे रक्कम अद्यापही वितरीत केलेले नाही. एकीकडे नियमावर बोट ठेवत हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत असले तरी दुसरी विमा कंपनीच्या प्रतिनीधीकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिरपूर, माळवंडी येथे पंचनामे करण्याच्या बदल्यात 24 शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच सर्वेक्षण होऊनही त्यानंतर सर्वेक्षणाच्या नावाखाली ही लूट करण्यात आली होती. कृषी विभागाने या शेतकऱ्यांचे जवाब नोंदवून घेतले होते. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या स्वप्नील गंगाधर कमटवाड व सुरेश रमेश सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीत दोघांविरोधात गुन्हा दाखल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या अनुशंगाने रिलायन्स जनरल क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडे विमा रक्कम भरलेली आहे. या पिकांच्या नुकसानीबद्दल विविध निकषांच्याआधारे विमा परतावा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले आहेत. मात्र, कंपनीचे कामकाज पाहणारे राज्य समन्वयक प्रमोद पाटील, विजय मोरे यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे कायम दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जिल्हा पीकविमा समितीचे सदस्य सचिव विजय लोखंडे यांनी परभणी येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काय होऊ शकते शिक्षा?
रिलायन्स कंपनीच्या दोन प्रतिनीधींकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकऱ्यांकडून लाच घेतल्या प्रकरणी बुलडाणा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा फसवणुकीचा गुन्हा हा अदाखलपात्र आहे. त्यामुळे हा गुन्हा सिध्द झाल्यास सात वर्षापर्यंत कारावसाची शिक्षा होऊ शकते तर परभणी येथील गुन्हा सिध्द झाल्यास दोघा राज्य समन्वयकांना सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते.