कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे ‘सोनं’ करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला

कापसाची तोडणी ही अंतिम टप्प्यात आहे. तोडणी झाली की शेतकऱ्यांना वेध लागतात ते विक्रीचे. मात्र, ज्या पिकाला अधिकचा दर आहे त्या पिकाची विक्री करताना किमान बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण यंदा कापसाचे उत्पादनच हे मुळात कमी झालेले आहेय त्यात पावसाने उत्पादनावर आणि पिकावर परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये भविष्यात काय दर राहतील याचा अभ्यास करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

कापूस विका पण गरजेपुरता अन् उरलेल्या कापसाचे 'सोनं' करा, शेतकऱ्यांना लाखमोलाचा सल्ला
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 10:45 AM

लातूर : शेती व्यवसयाचे सर्व गणित हे बाजारपेठेवर अनलंबून आहे. सध्या सोयाबीन वगळता इतर खरीपातील पिकांना चांगला दर मिळत आहे. Cotton, cotton prices rise,  कापसाचे दर तर कायम तेजीतच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण In the international market आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, निर्यात आणि भारतात कमी उत्पादन झालेले आहे. त्यामुळे दर हे वाढतेच राहणार आहेत. सध्या बाजारात कापसाला 7 हजाराचा दर आहे. तर कापसाची तोडणी ही अंतिम टप्प्यात आहे. तोडणी झाली की शेतकऱ्यांना वेध लागतात ते विक्रीचे. मात्र, ज्या पिकाला अधिकचा दर आहे त्या पिकाची विक्री करताना किमान बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण यंदा कापसाचे उत्पादनच हे मुळात कमी झालेले आहेय त्यात पावसाने उत्पादनावर आणि पिकावर परिणाम झालेला आहे. अशा परस्थितीमध्ये भविष्यात काय दर राहतील याचा अभ्यास करणेही तेवढेच महत्वाचे आहे.

शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापसाला 6025 दर ठरवण्यात आला आहे. शिवाय नियम-अटी ह्या वेगळ्याच. तर दुसरीकडे बाजारात कापसाची खरेदी ही 7 हजाराने केली जात आहे. त्यामुळे कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र सुरु केली तरी शेतकरी तिकडे फिरकतील की नाही हे पहावे लागणार आहे. दरातील तफावत आणि नियम अटी यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरु करायची की नाहीत याचा विचार राज्य सरकारने करण्याच्या सुचना केंद्राने दिलेल्या आहेत. मात्र, बाजारात कापसाला किमान 7 हजाराचा भाव मिळत आहे. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये नेमका काय निर्णय घ्यावा जो अधिकचा फायद्याचा राहिल. याबाबत कॅाटन कॅार्पोरेशनेच मार्गदर्शन केलेले ते कापूस उत्पादकांसाठी फायद्याचे राहणार आहे.

कापसाची ‘सोन्या’ प्रमाणे साठवणूक करा

कापूस बाजारात दाखल होताच तेजीत आहे. सध्या कमी प्रमाणात आवक होऊनदेखील कापसाचे दर हे 7 हजारहून अधिक झाले आहेत. शिवाय सोयाबीनप्रमाणे यामध्ये चढ-उतार होणार नाही उलट उत्पादनच कमी असल्याने भविष्यात देखील दर वाढणार आहेत. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे एकूण उत्पादनापैकी कापसातची विक्री केली तरी अपेक्षित पैसे पदरात पडणार आहेत. मात्र, सगळाच कापूस विकण्याची घाई करु नका, कारण भविष्यात कापसाचे दर अणखिण वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत आहे तर उत्पादन हे कमी आहे.

5 लाख हेक्टराने कमी झाली पेरणी

मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनचा पेरा वाढवून कापसाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. यंदा राज्यात 40 लाख हेक्टरावर पेरा झाला होता जो गतवर्षी 45 लाख हेक्टरावर कापूस होता. मात्र, शेतजमिनीची खराबी आणि उत्पादनात घट यामुळे शेतकरी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित करीत आहे. यंदा मात्र, सोयाबीनच्या दरात घट झाल्याने शेतकऱ्यांची मदार ही आता कापसावरच आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक हे चित्र असल्याने पांढऱ्या सोन्याला किंमत मिळत आहे.

हमीभावापेक्षा दर कमी होणारच नाही

राज्यात 80 कापूस खरेदी केंद्र उभारण्याचे नियोजन हे ‘सीसीआय’ ने केले आहे. त्याअनुशंगाने सर्व तयारी झाली आहे मात्र, हमीभाव केंद्रावरचा दर हा 6025 एवढा ठरवून देण्यात आलेला आहे. यंदा पावसामुळे कापसाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असला तरी उत्पादनच कमी असल्याने त्याचा एवढा दरावर परिणाम होत नाही. बाजारात कापसाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आता 8 हजारावर दर जाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे हमीकेंद्र उभारण्याच आली तरी शेतकरी अधिकच्या दराकडेच आकर्षित होणार. (Cotton prices will go up in future too, farmers will get higher income)

संबंधित बातम्या :

दुष्काळात तेरावा : शॉर्टसर्किटने 10 एकरातील ऊसाचा फड जळून खाक ; लाखोंचे नुकसान

अतिवृष्टीने फेरले स्वप्नांवर पाणी… कशी करावी लेकीची पाठवणी?

तयारी रब्बीची : खतांची खरेदी करताय, मग ‘अशी’ घ्या काळजी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.