AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसानं महाराष्ट्र का धास्तावला? ढगाळ वातावरणामुळे होणार भयंकर परिणाम

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. त्याचा परिणाम कोकणात पहायला मिळतो आहे.

अवकाळी पावसानं महाराष्ट्र का धास्तावला? ढगाळ वातावरणामुळे होणार भयंकर परिणाम
| Edited By: | Updated on: Dec 14, 2020 | 10:31 AM
Share

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. त्याचा परिणाम कोकणात पहायला मिळतो आहे. रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळच्या सुमारास आज तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पहायला मिळाल्या. यामुळे सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. (Due to untimely heavy rains in maharashtra big crisis has fallen on the farmers)

गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या हवामानाचा परिणाम आंब्यावर होण्याची शक्याता वर्तवली जाते आहे. यामुळे आंबा हंगाम लांबवणीवर पडणार आहे. तर आंब्यावर तु़डतुड्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणावणार आहे. शहापूरमध्येही अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे भाजीपाला लागवड आणि वीट भट्टी यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याचंही पाहायला मिळालं. या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं कंबरडं पुन्हा मोडणार असं बोललं जात आहे.

ढगाळ हवामानाचा रब्बी पिकं आणि फळबागांना फटका

खरंतर, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोकणासह नागपूर-विदर्भातही ढगाळ हवामान आहे. यामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. विदर्भात चणा, गहू, तूर, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर रब्बी पिकांवरही कीड- रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातही अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. हरभरा, तूर, गहू, जोंधळा, करडी, सूर्यफूल या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाच्या झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं आहे.

अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत

हवामानातील बदलांमुळे अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. बेमोसमी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष, कांद्यासह रब्बी पिकांनाही फटका बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष कांद्यावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आणखी काही दिवस असंच वातावरण राहिलं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Due to untimely heavy rains in maharashtra big crisis has fallen on the farmers)

इतर बातम्या –

MumbaiRains : मुंबईसह राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात, पुढच्या 24 तासांसाठी हवामान खात्याकडून इशारा

Weather Alert : राज्यासाठी पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना इशारा

(Due to untimely heavy rains in maharashtra big crisis has fallen on the farmers)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.