औषधी गुणांनी संपन्न, अनेक आजारांवर गुणकारी, शेवग्याच्या शेतीतून आर्थिक कमाईची संधी, वाचा सविस्तर

शेवग्याचं वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. ही एक बहुउपयोगी वनस्पती असून वनस्पतीचा सर्व भाग अन्न, औषध, औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरला जातो.

औषधी गुणांनी संपन्न, अनेक आजारांवर गुणकारी, शेवग्याच्या शेतीतून आर्थिक कमाईची संधी, वाचा सविस्तर
शेवग्याचा शेंगा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:30 PM

नवी दिल्ली: शेवगा आणि शेवग्याच्या शेंगाचा उल्लेख औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती म्हणून केला जातो. उत्तर भारताच्या तुलनेत शेवगा आणि कडीपत्ता यांचे महत्त्व दक्षिण भारतातील लोकांना अधिक माहिती आहे. शेवग्याचं वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. ही एक बहुउपयोगी वनस्पती असून वनस्पतीचा सर्व भाग अन्न, औषध, औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरला जातो. शेवग्याचं पीक वर्षभर घेतले जाते. शेवग्याची लागवड केवळ भारतातच नाही तर फिलीपिन्स, हवाई, मेक्सिको, श्रीलंका, मलेशिया इत्यादी देशांमध्येही केली जाते.

शेवग्याच्या शेतीतून चांगली आर्थिक कमाई

कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंह यांनी शेवग्याची लागवड करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत असल्याचं सांगितलं. परंतु हे शेवग्याची भाजी किंवा त्यापासून बनवण्यात येणारे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. शेवग्याची कापणी वर्षातून दोनदा केली जाते. पारंपारिक शेवग्याच्या झाडांना वर्षातून एकदा फळ येते. अनेकदा हिवाळ्यामध्ये शेवग्याचा वापर फळ भाजी म्हणून केला जातो. मात्र, अलीकडे काही प्रजातींचं संशोधन करण्यात आलं आहे. त्याप्रजातींमध्ये शेवग्याला दोनदा शेंगा येतात. दक्षिण भारतात शेवग्याची लागवड अधिक प्रमाणात केली जाते.

औषधी आणि औद्योगिक गुणधर्म लक्षात घेऊन शेतकरी दीर्घ कालावधीसाठी उत्पन्नाचा स्त्रोत म्हणू पाहू शकतात. शेवग्याचं पीक कोणतीही विशेष काळजी न घेता आणि कमी उत्पन्न खर्चावर करता येते. पडीक जमिनीवर काही शेवग्याची झाडे लावून विक्री करुनही ते आर्थिक नफा मिळवू शकतात.

मुबलक पोषणतत्वे

डॉ. चंद्रदेव प्रसाद सागंतात की, शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक आणि जीवनसत्त्वे असतात. एका अभ्यासानुसार, यात दुधापेक्षा चार पट पोटॅशियम आणि संत्र्यापेक्षा सात पट जास्त व्हिटॅमिन सी असते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. शेवग्याची साल, पाने, बियाणे, डिंक, रूट इत्यादीपासून आयुर्वेद औषध तयार करता येते जाऊ शकते.

अँटीबायोटिक अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल गुणधर्म

कोरोनापासून वाचण्यासाठी शेवग्याच्या भाज्यांचं सेवन करणे आवश्यक आहे. त्यातील गुणधर्मांमुळे कोरोनाविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते. ज्यांना कोरोना संसर्ग झाला आहे ते शेवग्याच्या शेंगांची भाजी खाऊ शकतात. शेवग्याच्या सेवनाने दीर्घ आराम मिळतो. त्याची साल बारीक केल्यास गुडघेदुखीत जास्तीत जास्त आराम मिळतो. याच्या पावडरने डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळतो. शेवग्याच्या पानांवरुन बनवलेल्या बाजारात मोरिंग्या सिरपही बाजारात आला आहे. ते 300 पेक्षा जास्त रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

इतर बातम्या:

आधी आसाम आणि आता कर्नाटक, भाजपात आलेल्यांना अच्छे दिन, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी बोम्मईचं नाव

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार; नितीन राऊत यांची मोठी घोषणा

Experts said Eat drumstick drive away diseases and farmers earn a lot by farming

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.