काय सांगता ? शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंत नव्हे तर 5 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज, लातूर जिल्हा बॅंकेची घोषणा
बॅंकेतील उलाढाल आणि शेतकऱ्यांचा विश्वास यामुळेच बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान ऊंचावत आहे. आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत पीक कर्ज हे दिले जात होते पण आता यापुढे 5 लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणार असल्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली आहे.
लातूर : गेल्या 30 वर्षामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातही उभारण्यात आलेल्या सहकारी सोसायटी कोटी रुपयांच्या झाल्या आहेत. बॅंकेतील उलाढाल आणि शेतकऱ्यांचा विश्वास यामुळेच बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान ऊंचावत आहे. आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत पीक कर्ज हे दिले जात होते पण आता यापुढे 5 लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणार असल्याची घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली आहे.
राज्यात नव्हे तर देशात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज देणारी लातूर जिल्हा बँक पहिली ठरली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आँनलाईनद्वारे मुख्यालयात घेण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते
सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचे काम या जिल्हा बॅंकेने केले आहे. कोविड काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी रुपये मदत केली. बँकेच्या कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी बोनस म्हणून 22 टक्के व कोविड काळात अधिक काम केल्याने कर्मचाऱ्यांना बोनस व्यतिरिक्त एक महिन्याचा जादा पगार देण्याची घोषणा केली आहे. कोविड आपत्कालीन काळात देखील 100 टक्के वसुली करून एन.पी. ए सुद्धा निरंक ठेवण्यात बँकेचे अधिकारी कर्मचारी, गटसचिव यांचा मोठा सहभाग असल्याचे यावेळी दिलीप देशमुख यांनी सांगितले.
लवकरच मोबाईल व्हॅन द्वारे कोअर बँकिंग सेवा तालुक्यात देणार
सध्या जिल्ह्यात बँकेच्या वतीने एटीम सेवा बँकिंग सेवा 15 ठिकाणीं सुरू असून लवकरच तालुक्यात व्हॅन बँकिंग सेवा देण्यात येणार आहे. नागरिकांना कमी वेळात अधिक सेवा देण्याचा प्रयत्न करतोय बॅंकेच्यावतीने केला जात आहे. शेतकरी, शेतमजूर यांना त्रास होऊ नये यासाठी लवकरच हि व्हॅन बँकिंग सेवा देणार असल्याचे दिलीपराव देशमुख यांनी सांगितले
शेतकऱ्यांच्या हीतासाठी जिल्हा बँक जपली पाहिजे
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही ग्रामीण भागातील लोकांची मातृत्व संस्था उभी राहिली आहे. लाखो लोकांचें संसार शेतीवर अवलंबून असतात साखर कारखाने व जिल्हा बँक यावर लाखो शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यामूळे पुढील काळात सुधा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जिल्हा बँकेत समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रगतीसाठी राजकारण करू असा विश्वास व्यक्त य़ावेळी देशमुख यांनी व्यक्त केला.
5 लाखापर्यंत कर्ज देणारी पहिलीच जिल्हा बॅंक
आता पर्यंत जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज हे दिले जात होते. मात्र, यामधून योग्य तो फायदे शेतकऱ्यांना घेता येत नाही. अधिकची रक्कम अदा केल्याने शेतकऱ्यालाही उलाढाल करण्यास सोईस्कर होणार असल्याने हे निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव पीक कर्जाबरोबरच जिल्ह्याभरात असलेल्या शाखांच्या ठिकाणी वेगवेगळ्या सोई-सुविधा देण्याची निर्धार या सर्वसाधारण सभेत संचालकांनी व्यक्त केला आहे. (Farmers now get binayaji crop loan up to Rs 3 lakh and not up to Rs 5 lakh, Latur District Bank announced)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांची पोरं लई भारी, # सोयाबीन ट्रेंड टॅापवर
सांगोलकरांचे डाळिंब आता दोन कोटींच्या शीतगृहात, राज्यातील दुसरं मोठं शीतगृह सांगोल्यात