अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या ‘त्या’ 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश

बार्शी तालुक्यातील 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे (Panchanama) हे वगळण्यात आले होते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होणार होते. (Damage Crop) पीकाचे नुकसान शिवाय मदतीसाठी या गावचे शेतकरी हे पात्र झाले नसते. परंतू या 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे करुन घेण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या 'त्या' 48 गावातील पीकांचेही होणार पंचनामे ; पुनर्वसन मंत्र्यांचे आदेश
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 12:13 PM

सोलापूर : मराठवाड्याप्रमाणेच या विभागालगतच्या जिल्ह्यातील खरीप पीकांचे पावसामुळे नुकसान झालेले होते. मात्र, बार्शी तालुक्यातील 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे (Panchanama) हे वगळण्यात आले होते. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान होणार होते. (Damage Crop) पीकाचे नुकसान शिवाय मदतीसाठी या गावचे शेतकरी हे पात्र झाले नसते. परंतू या 4 मंडळातील 48 गावातील पंचनामे करुन घेण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे पंचनामे तर होणार असून नुकसानभरपाईबाबत काय होणार हे पहावे लागणार आहे.

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे केवळ खरीप हंगामातील पीकाचेच नाही तर फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडलांस अतिवृष्टीतून वगळण्यात आले होते. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता आ. राजेंद्र राऊत आणि अरुण बारबोले यांनी या 48 गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

यामुळे वगळण्यात आली होती गावे

बार्शी तालुक्यातील मंडळानिहाय पावसाचे प्रमाण हे कमी-अधिक आहे. त्यामुळे वैराग, खांडवी, सुर्डी व नारी ही मंडळे वगळता पंचनामे करण्यात आले. मात्र, या चार मंडळात सततचा पाऊस नसल्याचे कारण सांगत पंचनामे करण्यात आले नव्हते. मात्र, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि आर्थिक कोंडी लक्षात घेता आ. राजेंद्र राऊत यांनी या 48 गावातील पीकांचेही नुकसान झालेले आहे. येथील अधिकारी- कर्मचारी यांना पंचनामे करुन घेण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानुसार आता पंचनामे केले जाणार आहेत.

सोयाबीनसह कांद्याचेही नुकसान

बार्शी तालुक्यातील वैराग, खांडवी, सुर्डी व नारी या मंडळातील पंचनामे झालेले नाहीत. मात्र, पावसामुळे येथील सोयाबीन या मुख्य पीकाचे तर नुकसान झालेच आहे पण पावसाळी कांद्याचाही वांदा झालेला आहे. असे असतानाही सततचा पाऊस या मंडळात नसल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे पंचनामे होणार की नाही अशी अवस्था झाली होती. अखेर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून मदतीबाबत या 48 गावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

सरासरीपेक्षा दीडपट पाऊस

बार्शी तालुक्यात पावसाची सरासरी ही 524 मि.मी एवढी आहे. यंदा मात्र, आतापर्यंत 765 मि. मी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे फळपिके, भाजीपाला याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण त्या आगोदर संपूर्ण तपासणी करुन पंचनामे करण्याचे सांगण्यात आल्याने पंचनामे झाले तरी प्रत्यक्षात अहवाल काय जाणार यावरच मदतीचे स्वरुप अवलंबून आहे. (Farmers ordered to conduct panchnamas for crop damage in villages excluded from heavy rains)

संबंधित बातम्या :

मराठवाड्याला निकषांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई, पहा तुमच्या जिल्ह्याला कितीची मदत?

तयारी रब्बी हंगामाची : ज्वारीच्या उत्पादनाची वाढ अन् काय दुहेरी फायदा ?

गाळप हंगाम सुरु होताच ऊस वाहतूकदार, मुकादमांचा कोयता बंद मेळावा

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.