कृषीपंपाचा वीजप्रश्न पेटला : कोल्हापुरात राजू शेट्टींचे बेमुदत तर मोहळमध्ये कुणाचे आमरण उपोषण?

शेतकऱ्यांच्या बांधापासून ते राज्य विधीमंडळातील अधिवेशनापर्यंत सध्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत या एकाच विषयाची चर्चा होत आहे. केवळ चर्चा होत असून अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नसताना आता शेतकरी नेते आंदोलनाची भूमिका घेत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे कृषीपंपांना 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत तर दुसरीकडे आता जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनीही मोहळमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे.

कृषीपंपाचा वीजप्रश्न पेटला : कोल्हापुरात राजू शेट्टींचे बेमुदत तर मोहळमध्ये कुणाचे आमरण उपोषण?
कृषीपंपांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने मोहोळमध्ये आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 10:52 AM

सोलापूर : शेतकऱ्यांच्या बांधापासून ते राज्य विधीमंडळातील अधिवेशनापर्यंत सध्या (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत या एकाच विषयाची चर्चा होत आहे. केवळ चर्चा होत असून अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नसताना आता (Farmer Leader) शेतकरी नेते आंदोलनाची भूमिका घेत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष (Raju Shetty) राजू शेट्टी हे कृषीपंपांना 10 तास आणि तो ही दिवसा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करीत आहेत तर दुसरीकडे आता जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनीही मोहळमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरणने कृषीपंपाबाबत घेतलेली भूमिका ही चूकीची असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बांधावरची स्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न शेतकरी संघटना करीत पण यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

महावितरणच्या भूमिकेमुळे रब्बी पिकांचे नुकसान

रब्बी हंगामातील पिके ऐन बहरात आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणी मिळाले तर उत्पादनात वाढ होणार आहे पण कृषी पंपाचा विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ झाल्याने पिके कोमेजून जात आहेत. दरवर्षी रब्बी हंगामातच अशी भूमिका घेतली जात असल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. यंदा तर पाणीसाठा मुबलक असून त्याचा पुरवठा करणे मुश्किल झाले आहे.

जनहित शेतकरी संघटनेच्या काय आहेत मागण्या

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिलाची वसुली थांबवावी तसेच पैसे भरुनही त्याची पावती न देणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत असल्याची माहिती जनहितचे प्रभाकर देशमुख यांनी दिली. जोपर्यंत वीज बिलाची वसुली थांबत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा जनहितने दिलाय.

बैठकीत ठरणार राजू शेट्टी यांची भूमिका

शेतकऱ्यांच्या सुरक्षतेचा विचार करीता दिवसा आणि तो ही 10 तास विद्युत पुरवठा करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, उर्जामंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता आंदोलनाची पुढची दिशा काय असणार यासंदर्भात मंगळवारी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, आंदोलनाच्या दरम्यान, सबंध राज्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी शासकिय कार्यालयातच साप सोडल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.

संबंधित बातम्या :

उशिराचे शहाणपण : हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाणी पुरवठा करण्याचा पाटबंधारे विभागाचा ‘घाट’

ऊसतोड रखडल्याने शेतकऱ्यांनी शोधला ‘हा’ मधला मार्ग, मागणीही अन् वाढता दरही

Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.