ही माहिती गरजेची..! जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?

शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो.

ही माहिती गरजेची..! जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे ?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 12:18 PM

मुंबई : काळाच्या ओघात शेत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत. असे असले तरी नागरिक हे (Farm land) शेत जमिनीतच अधिकचा पैसा गुंतवत आहेत. एक स्थावर मालमत्ता म्हणून शेत जमिनीचे महत्व वाढत आहे. शेत जमिन विकत घेतली म्हणजे शेती करावीच असे नाही तर आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक व्हावा यामागची भूमिका. शिवाय शेत जमिन असणे आजही प्रतिष्ठेचे मानले जात आहे. पण शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? (government rates) याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. पण जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे ज्या ठिकाणची (importance of land) जमिनीची खरेदी करायची आहे त्या भागातील सरकारी दर काय आहेत याची माहिती कशी मिळवायची याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

सर्वकाही डिजिटल

आता जमाना बदलला आहे. सर्वकाही डिजिटल होत आहे. शिवाय शेती संबंधीची माहिती ही ऑनलाईन मिळावी हे तर सरकारचेच धोरण आहे. ज्याप्रमाणे 7/12, 8 अ हे ऑनलाईनद्वारे काढले जात आहेत. त्याचप्रमाणे शेतजमिनीचे सरकारी दरही काय आहेत याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्याची फसवणूक होत नाही शिवाय त्या भागातील शेतजमिनीचा अंदाजही बांधता येणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

*जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सर्व प्रथम Google वेबसाईटवर जाऊन तिथे असलेल्या सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असे टाईप करायचे आहे. * त्यानंतर मात्र, आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाची वेबसाईट सुरु होईल. या पेजच्या डाव्या कोपऱ्यात वेगवेगळे तीन मुद्द्यांचे टॅप दिसतील. यापैकी महत्त्वाचे दुवे असा लिहलेली टॅब दिसेल त्यावर क्लिक करा मग आपल्यासमोर बरेचशे पर्याय दिसतील. त्यापैकी मिळकत मूल्यांकन ह्या पर्यायावर क्लिक करा. * यानंतर बाजारमुल्य दर पत्रक नावाचे पेज ओपन होईल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ज्या जमिनीचा सरकारी भाव पाहयचा आहे. तो जिल्हा निवडा. * कोणत्या वर्षामध्ये किती भाव होता या पर्यावर क्लिक करुन आपल्याला कोणत्या वर्षात काय भाव होता याची देखील माहिती होणार आहे. * यानंतर आपल्याला ज्या भागात जमिन खरेदी करायची आहे. त्या गावचा जिल्हा, तालुका निवडायचा, त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्याला त्या गावातील शेतजमिनीचे किंवा जागेचे भावही समोर येणार आहेत. * यामध्ये संबंधिताला जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा सरकारी भाव काय आहे याची माहिती समोर येईल. * यामध्ये जे भाव दिलेले असतात ते हेक्टरमध्ये असतात. त्यानुसार एकरी काय भाव आहे याचा अंदाज बांधता येणार आहे.

जमिनीनुसार ठरतात दर

वरील प्रक्रियेत जमिनीचे सरकारी दर काय असतात याची तर माहिती मिळेलच. पण जिरायत जमिन, बागायती जमिन तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमिन, राष्ट्रीय महामार्गालगत येणारी जमिन त्यानुसार त्याचे दर हे ठरविण्यात येतात. यामुळे सध्याचे मुल्य आणि सरकारी दर काय याची माहिती झाली तर जमिनीचे नेमके भाव काय राहणार याचा अंदाज बांधता येणार आहे.

संबंधित बातम्या :

नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा , कांद्यासह भातशेतीचे वांदे, दोन दिवस धोक्याचेच

शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, रब्बी हंगामाबाबत महत्वपूर्ण सल्ला

औषधी वनस्पतीची शेती, 10 हजार रुपये क्विंटल असलेल्या वनस्पतीची भारतातून जगभरात निर्यात

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.