पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

नर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजना मृग बहार 2021-22 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या पिकांसाठी राबवण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी व्हा, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 6:53 PM

जालना: पुनर्रचित हवामान आधारित फळविक विमा योजना मृग बहार 2021-22 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, डाळिंब, संत्रा, चिकू, पेरु, लिंबू व सिताफळ या अधिसूचित पिकांकरीता अधिसूचित महसुल मंडळामध्ये एचडीएफसी अ‌ॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येत आहे. ही योजना शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सुचनानुसार यावर्षीपासुन कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. याबाबत कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील. (Jalana Agriculture department appeal to farmers submit forms in fruit insurance scheme)

कर्जदार शेतकरी हे संबंधित बँक शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा संस्था यांचेमार्फत योजनेत सहभाग नोंदवू शकतील. बिगर कर्जदार शेतकरी हे बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, विमा कंपनी प्रतिनिधी, विमा मध्यस्थी , आपले सरकार केंद्र अथवा स्वत: योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत व त्यानुषंगाने भरावयाची विमा हप्ता रक्कम खालीलप्रमाणे राहील.

लिंबू पिकासाठी 3500 रुपये विमा हप्ता

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2020-21, जालना जिल्ह्यासाठी संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये प्रति हेक्टर असून शेतक-यांनी 4 हजार रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे. लिंबु पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 70 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 3 हजार 500 रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे. पेरु पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 3 हजार रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे.

मोसंबी पिकासाठी 4 हजार हप्ता

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 4 हजार रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे. चिकू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 60 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 3 हजार रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे.

डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 30 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 6 हजार 500 रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे. सिताफळ पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 55 हजार रुपये प्रति हेक्टर असुन शेतक-यांनी 2 हजार 750 रुपये विमा हप्ता प्रति हेक्टर प्रमाणे भरावे.

संत्रा, लिंबू, पेरु, मोसंबी व चिकु या पिकांसाठी विमा दावा भरावयाची अंतिम दिनांक 30 जुन 2021 असून डाळिंब पिकासाठी 14 जुलै 2021 तर सिताफळ या पिकासाठी 31 जुलै 2021 या अंतिम दिनांक आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी या योजनेचा शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बा.रा. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे

संबंधित बातम्या:

VIDEO | शिवसेना आमदाराची हटके स्टाईल, थेट शेतात उतरुन यंत्राद्वारे भात लावणी

पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

(Jalana Agriculture department appeal to farmers submit forms in fruit insurance scheme)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.