किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर आजच करा ‘या’ गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी किसान सन्मान निधी योजनेतून 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये वळते केले आहेत.

किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर आजच करा 'या' गोष्टी
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 8:05 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी किसान सन्मान निधी योजनेतून 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपये वळते केले आहेत. केंद्र सरकारच्या या अत्यंत महत्त्वाच्या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा होतात. या योजनेचा देशभरातील कोट्यावधी शेतकरी लाभ घेत आहे. मात्र, अजूनही माहितीच्या अभावी अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहे. मात्र, या शेतकऱ्यांनाही या योजनेचा अजूनही लाभ मिळू शकणार असून त्यांना फक्त काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. (Kisan Samman Nidhi Yojana If you Didnt Get Money then follow these tips)

ज्या शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली असेल आणि शुक्रवारी जर त्यांच्या खात्यात पैसे आले नसतील तर असं का झालं? याची त्यांनी माहिती घ्यायला हवी. नाही तर पुढचा हप्ता मिळण्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर हे पैसे खात्यात येण्यासाठी काय केले पाहिजे हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्या खात्यात पैसे आले नसेल तर सर्वात आधी केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यातील यादीत तुमचं नाव आहे की नाही? याची माहिती घ्या. नाव चेक करताना तुम्हाला तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही याचं स्टेट्स समजेल. या संकेतस्थळावर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यात आली असून त्याच्या नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली की अपूर्ण आहे, हे त्यात नमूद करण्यात आले आहे. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण का झाली नाही? याची कारणंही या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. अनेक लोकांना अद्याप मंजुरी मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

असं करा नाव चेक

सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. तिथे गेल्यावर फार्मर कॉर्नरवर जाऊन लाभार्थीवर क्लिक करा. त्यानंतर जी माहिती मागितली जाईल ती भरा. नंतर GET Report वर क्लिक केल्यास तुम्हाला तुमच्या खात्याच्या बाबतीतील संपूर्ण माहिती मिळले. त्यात तुम्हाला स्टेट्स पाहावं लागेल. जर खात्यात FTO जनरेटेड आणि पेडिंग असं दाखवलं जात असेल तर तुमची नोंदणी झाली असून लवकरच तुमच्या खात्यात पैसे येतील. जर Rft Signed by State Government असं दाखवलं जात असेल तर तुमचा हप्ता येण्यास वेळ लागेल. परंतु काही दिवसांतच तुम्हाला हप्ता मिळून जाईल.

तुमचं नाव आणि स्टेट्स ओके असेल तर हेल्पलाईनवरून तुम्हाला बोलावं लागेल. त्यासाठी तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या PM-Kisan Helpline 155261 किंवा टोल फ्री 1800115526 नंबरवरून संपर्क करू शकता. त्याशिवाय 011-23381092 या नंबरवरूनही तुम्ही संपर्क साधू शकता. या नंबरवरून तुम्हाला तुमच्या खात्याची माहिती मिळेल. संकेतस्थळावरील यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायतीत जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही त्यांना आधी सर्व योजनांचे अत्यावश्यक दस्ताऐवज सबमिट करावे लागेल. (Kisan Samman Nidhi Yojana If you Didnt Get Money then follow these tips)

त्यासाठी तुम्हाला अप्लाय करावा लागेल. त्यानंतर ग्रामपंचायतीतील संबंधित अधिकारी ही कागदपत्रे व्हेरिफाय करून पुढे पाठवतात. त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होती. नोंदणी पूर्ण झाली आणि स्टेट्स ओके आला तर तुम्हाला या योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालाच म्हणून समजा. (Kisan Samman Nidhi Yojana If you Didnt Get Money then follow these tips)

संबंधित बातम्या:

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार

पश्चिम बंगाल सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान; मोदींचा नाव न घेता ममतांवर निशाणा

(Kisan Samman Nidhi Yojana If you Didnt Get Money then follow these tips)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.