किवी फळाच्या शेतीपासून घेता येते लाखोंचे उत्पन्न, जगभरात मागणी

गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना या फळाला व्यावसायिकतेचा दर्जा दिला आहे. केवी देशातही या फळाला वेगळा दर्जा प्राप्त झाला असून त्याला सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहे. जगभरात किवीची मागणी वाढत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

किवी फळाच्या शेतीपासून घेता येते लाखोंचे उत्पन्न, जगभरात मागणी
kiwi
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 5:23 PM

Kiwi Farming: अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) जीरो घाटी जंगलात वीस वर्षीपूर्वी मिळणाऱ्या किवी फळाकडे कुणाचे लक्षही गेले नव्हते. मात्र गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना या फळाला व्यावसायिकतेचा (professional recognition) दर्जा दिला आहे. केव्ही देशातही या फळाला वेगळा दर्जा प्राप्त झाला असून त्याला सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करून देण्यात आला आहे. युक्रेन देशातील कीवमध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे वर्षाला 8 हजार मेट्रीक टन किवीचे उत्पादन घेतले जाते. आपल्याकडे सफरचंद आणि संत्री या दोन्ही प्रकारची शेती उत्तम पद्धतीने केली जाते.

अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव नरेश कुमार टीव्ही नाईनला दिलेल्यी मुलाखतीत म्हणतात राज्य कृषि क्षेत्रामध्ये किवीचे नवनवे प्रयोग करून विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंतील प्रेमा खाडू यांच्या सुचनेनुसार फळ आणि खाद्य तेलाचे उत्पादनात घट झाली आहे. देशाच्या उत्पादनात किवी शेतीचा 50 टक्के वाटा आहे. अरुणाचल प्रदेशातील शेतकरी वर्षाला 8 हजार मेट्रीक टनाचे उत्पादन घेतात. अरुणाचल प्रदेशात फळ, हळदीचे आणि संत्री पिकवली जात असली तरी देशाला ओळख करून देणारे स्वतःची अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी किवी फायदेशीर झाला आहे.

किवीच्या शेतीसाठी केंद्र सरकारच्या योजना

किवीच्या शेतीली प्रोत्साहन देण्यासाठी लोअर सुबनसिरी जिल्ह्यामध्ये किवी संशोधन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. किवी फळ हे भविष्यातील व्यावसायिक फळ म्हणून खूप महत्वपूर्ण आहे.कधी काळी किवी फळासाठी आपला देश इतर देशावर अवलंबून होता, मात्र आता आपल्याच देशात किवीचे उत्पादन घेतल्यामुळे नागरिकांची चिंता मिठली आहे. आता ज्या राज्यात किवीचे उत्पादन घेतले जाते त्या राज्यांसाठी केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत.

कित्येक वर्षांनी प्रमाणित

सुबनसिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या किवी फळाला तीन वर्षापूर्वीच मान्यता मिळाला आहे. सुबनसिरी जिल्ह्याचे जिल्हा फलोत्पादन अधिकारी कोमरी मुर्टेम यांनी सांगितले की, सेंद्रीय प्रमाणीकरणाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठा, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फळाला स्थान मिळविण्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. भारतात नियामक संस्था, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत केलेल्या वैज्ञानिक मूल्याकनानंतर मान्यतेचे प्रमाणपत्र दिले जाते.

अरुणाचल प्रदेशातून मोठे उत्पादन

अरुणाचल प्रदेशचे सचिव नरेश कुमार सांगतात की स्थानीक पातळी खाण्यासाठी म्हणून 2 हजार रूपयामध्ये या फळाला व्यावसायिकतेचा दर्जा देण्यात आला होता. मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यावर प्रचंड मेहनत घेऊन त्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. अरुणाचल प्रदेशाची उंची समुद्र सपाटीपासून पंधराशे ते दोन हजार किलोमीटरवर आहे, मात्र हीच उंची किवी फळासाठी आदर्शवत आहे. 2000 सालाच्या मध्यापासून हे फळ बाजारात उपलब्ध करण्यात आले. डोंगराळ प्रदेश किवीसाठी योग्य असल्याने किवी फळ वेलीवर फुल यावे तशी या फळाचे उत्पादन येते.

देशभरातून मागणी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

किवी फळाला लोकमान्यता मिळवून देण्यासाठी 2020 साल उजडावे लागले आहे. या फळासाठी सेंद्रिय प्रमाणपत्राची गरज होती, ती आता मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात किवीला त्याचा फायदा होणार आहे. देशाच्या राजधानीबरोबरच इतर ठिकाणीही किवीची मागणी वाढली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.