Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : आनंदाची बातमी, अखेर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती

भारतीय हवामान विभागानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याची माहिती दिली आहे. Southwest Monsoon Kerala IMD

Monsoon : आनंदाची बातमी, अखेर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 2:07 PM

मुंबई: भारतीय हवामान विभागानं मान्सून (Monsoon) केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. केरळच्या दक्षिण भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीचं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे कार्यकारी संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार केरळच्या दक्षिण भागात मान्सून धडकला आहे. ( Monsoon 2021 update Southwest Monsoon has hits Kerala said by IMD)

मान्सून दोन दिवस लेट

भारतीय हवामान विभागनं यापूर्वी मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल, असं म्हटलं होते. मात्र, त्यानंतर 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असं सांगण्यात आलं. भारतीय हवामान विभागानं पुन्हा नवीन माहिती देत 3 जूनला मान्सून दाखल होईल, असं सांगितलं होतं त्याप्रमाणं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी साधारणपणे मान्सून 1 जूनला दाखल होतो, यंदा दोन दिवसं उशिरानं केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचं सांगितलं आहे.

मान्सून सरासरीच्या 101 टक्के बरसणार

भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) नैऋत्य मोसमी वाऱ्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच (IMD Monsoon forecast) आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

( Monsoon 2021 update Southwest Monsoon has hits Kerala said by IMD)

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण: गाडीचा फॉरेन्सिक रिपोर्ट काय?.
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड
निर्घृण हत्येनंतर..., संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक पुरावा उघड.