मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबणीवर जाऊ शकते. तर, दुसरीकडे वाशिममध्ये खतांचाही तुटवडा जाणवत आहे. Monsoon rain started in Maharashtra

मान्सून दाखल, महाबीज शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी करणार? रासायनिक खतांचाही तुटवडा
डीएपी आणि सोयाबीन बियाणं
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 2:30 PM

मुंबई: महाराष्ट्रात मान्सून पाऊस दाखल झाला आहे. राज्यातील 80 टक्केहून अधिक भाग मान्सूननं व्यापला आहे. मान्सून पाऊस दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. शेतकऱ्यांची पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते खरेदीसाठी लगबग सुरु आहे. मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेलेले आहेत. महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबणीवर जाऊ शकते. तर, दुसरीकडे वाशिममध्ये खतांचाही तुटवडा जाणवत आहे. (Monsoon rain started in Maharashtra Parbhani farmers waiting for soybean seeds from Mahabeej washim farmers waiting for fertilizers)

महाबीजच्या बियाण्याची परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

मृग नक्षत्र शेतकऱ्यांसाठी अतिशय धावपळीचं असतं. या नक्षत्राच्या आगमनानेच शेतकरी आपल्या शेतीत पेरणी करतो. मात्र, यंदा मृग नक्षत्राचे आगमन होऊन 3 दिवस लोटले आहेत. तरीही महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर जाऊ शकते

वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतांचा तुटवडा

वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत आहे. कृषी सेवा केंद्रांकडे खतांची मागणी शेतकरी करत असता, कृषी सेवा केंद्राकडून खतं उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर जिल्ह्यात पाऊस बरसल्याने पेरणीरणीपूर्वी मशागतीच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्यातील हळदीची अनेक ठिकाणी लागवड शेतकरी करत असल्याने शेतकऱ्यांची हळद लागवडीचे सुद्धा लगबग सुरू झाली आहे.

बी-बियाणे, रासायनिक खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. डीएपी, 10:26:26 या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.सदर खत कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे.

बियाणे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी करत असल्याचं चित्र आहे. मात्र, शेतकऱ्यांना हव्या तितक्या प्रमाणात बियाणं आणि खतं मिळत नसल्याच समोर आलं आहे.

सोयाबीन पेरणी कधी करावी?

खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकू नका, सोयाबीन बियाण्याचे दर नियंत्रित करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी

TV9 Marathi Impact: लासलगांव बाजार समितीत 75 वर्षांची पंरपरा रद्द, अमावस्येला कांदा लिलावाला सुरुवात

Monsoon rain started in Maharashtra Parbhani farmers waiting for soybean seeds from Mahabeej washim farmers waiting for fertilizers

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.