AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural Exhibition: दीड टन वजनाच्या ‘गजेंद्र’ रेड्याचा रुबाबच वेगळा,कोट्यावधीची बोली अन् मालकाची ना..

राज्यातच नाही तर परराज्यातील कृषी प्रदर्शनात देखील गजेंद्र या रेड्याचीच चर्चा अधिक असते. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता तो हा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा. आता हाच रेडा जिल्ह्यातील राहुरी येथे पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यापूर्वीच या रेड्याला 80 लाख रुपयांत खरेदी करण्याची तयारी एका हौशी शेतकऱ्याने दर्शवली होती पण मालक विलास नाईक यांनी साफ नकार दिला होता.

Agricultural Exhibition: दीड टन वजनाच्या 'गजेंद्र' रेड्याचा रुबाबच वेगळा,कोट्यावधीची बोली अन् मालकाची ना..
राहुरी येथील कृषी प्रदर्शनातील गजेंद्र मुरा जातीचा रेडाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 10:20 AM
Share

अहमदनगर : राज्यातच नाही तर परराज्यातील (Agricultural Exhibition) कृषी प्रदर्शनात देखील गजेंद्र (Buffalo) या रेड्याचीच चर्चा अधिक असते. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता तो हा दीड टन वजनाचा गजेंद्र रेडा. आता हाच रेडा जिल्ह्यातील (Rahuri) राहुरी येथे पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यापूर्वीच या रेड्याला 80 लाख रुपयांत खरेदी करण्याची तयारी एका हौशी शेतकऱ्याने दर्शवली होती पण मालक विलास नाईक यांनी साफ नकार दिला होता. अवघ्या 4 महिन्यात 20 लाख रुपये वाढवून गजेंद्रला 1 कोटी रुपायांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती पण गजेंद्र हा घरची पैदास असल्यामुळे त्याला न विकण्याचा निर्णय घेतल्याचे विलास नाईक यांचे म्हणणे आहे.

1 कोटी रुपयांमध्ये खरेदीची तयारी

गजेंद्र हा मुरा जातीचा रेडा असून प्रत्येक कृषी प्रदर्शनात त्याचे दर्शन हे घडतेच. शिवाय रेड्याचा रुबाब आणि देखणे रुप पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी ही होतेच. असाच प्रत्यय राहुरी येथे पार पडत असलेल्या कृषी प्रदर्शनात आला. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनात याच रेड्याला 80 लाखाची मागणी झाली होती. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यांतच येथील प्रदर्शनात त्याला 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याची तयारी दर्शविण्यात आली पण रेड्याचे मालक हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. मुरा जातीच्या या रेड्याची पैदास ही घरची आहे. त्यामुळे विकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पण कृषी प्रदर्शन मात्र या गजेंद्र मुळे गाजते हे नक्की.

‘गजेंद्र’ रेड्याच खुराक तर पहा

आता दीड टन वजन म्हणल्यावर त्याचा खुराकही तसाच आहे. गजेंद्र हा मूळचा कर्नाटकातील मुंगसुळी या गावच्या विलास नाईक यांच्या मालकीचा आहे. दिवासाला 15 लिटर दूध, 3 किलो भरडा, 3 किलो आटा, 5 किलो सफरचंद, ऊस, गवत आधी खाद्य या गजेंद्रला दिवसाला लागते. नाईक यांच्या घरच्या मुरा म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजार किलोमीटरवर वरून लोक पाहण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे गजेंद्र रेड्याचे वजन केवळ 4 वर्षे 5 महिने आहे.

चार महिन्यापूर्वी 80 लाखाची मागणी

मुरा जातीच्या या गजेंद्र रेड्याला पाहताच क्षणी कुणालाही तो खरेदी करावा असेच वाटते. यापूर्वी सांगली जिल्ह्यात पार पडलेल्या प्रदर्शनात त्याला तब्बल 80 लाखाला मागणी झाली होती. त्यानंतर आता येथील कृषी प्रदर्शनात 1 कोटीला मागणी झाली आहे. पण शेतकरी आपल्या निर्णयावर ठाम आहे.यावरुन जनावरांबद्दलचे प्रेम काय असते याची तर प्रचिती येतेच पण विलास नाईक हे आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे गजेंद्र चा सांभाळ करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Onion Market: बुडत्याला काडीचा आधार, ‘नाफेड’ ची खरेदी अन् शेतकऱ्यांना फायदा, कांद्याच्या मुख्य मार्केटमध्ये चाललयं काय?

Weather Update: पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता! विदर्भ वगळता मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

Wheat Export: गहू निर्यातीचा श्रीगणेशा..! इजिप्त ठरला पहिला मानकरी, महाराष्ट्राची भूमिका काय?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.