AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बी हंगामातील कांदा ; लागवडीपासून काढणीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

रब्बी हंगामातील कांदा लागवडीला यंदा पावसामुळे उशीर झाला आहे. शिवाय पावसामुळे रोपही खराब झाले असल्याने अधिकच्या दराने रोपाची खरेदी करुन आता कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. ज्या भागात पावसाने उघडीप दिली होती त्या भागात कांद्याची लागवड झाली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा लागवडीची लगबग ही सुरु आहे.

रब्बी हंगामातील कांदा ; लागवडीपासून काढणीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 2:35 PM
Share

लातूर : रब्बी हंगामातील (Onion cultivation) कांदा लागवडीला यंदा पावसामुळे उशीर झाला आहे. ( cash crop) शिवाय पावसामुळे रोपही खराब झाले असल्याने अधिकच्या दराने रोपाची खरेदी करुन आता कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. ज्या भागात पावसाने उघडीप दिली होती त्या भागात कांद्याची लागवड झाली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा लागवडीची लगबग ही सुरु आहे.

शेतकऱ्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य ती काळजी घेतली तर अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. त्यामुळे याची लागवड पध्दत ते काढणीपर्यंतचा प्रवास शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. (highest onion production in Maharashtra) महाराष्‍ट्रामध्‍ये सुमारे 1 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये (Nashik) नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हे जिल्हे कांद्यासाठी प्रसिध्‍द आहेत.

हवामानाचा कसा होतो परिणाम

कांदा हेक्‍टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्‍त असते. पाण्‍याचा निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते. या जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळल्यास उत्पादनात वाढ होणार आहे.

लागवड हंगाम

राज्यात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात. शिवाय बसवंत 780 : खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्‍यमहिन्‍यात ते मोठे असतात. या वाणाच्या रोपातून 100 ते 120 दिवसांमध्ये पिक पदरी पडते. तर हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. तर एन- 2-4-१ : ही जात रब्‍बी हंगामासाठी योग्‍य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्‍यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल मिळते. हेक्टरी 10 किलो बियाणे हे पुरेसे आहे.

लागवड पध्दती

कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणाऱ्या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफ्यातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. रोपांना हरबऱ्यासारखी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. रब्‍बीची रोपे 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात.

आंतरमशागत व किडीचा प्रादुर्भाव

रोपांच्‍या लागवडीनंतर शेतात तण दिसल्‍यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो. कांदयावर प्रमुख रोग म्‍हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्‍ यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्‍टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्‍टभागात खरडतात. व त्‍यात स्‍त्रवणारा रस शोषतात. त्‍यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

 संबंधित बातम्या :

यंदा ऊसाचा गोडवा अधिक वाढणार, रब्बी पेरणीवरही परिणाम

दिवाळीमुळे हळदीला चढला पिवळा रंग, मागणीत वाढ दरात मोठा बदल

रब्बीची पेरणी लांबणीवर ; शेतकऱ्यांनो अशी काळजी अन्यथा उत्पादनात होणार घट

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.