पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहीती, तर मिळेल मासिक पेन्शनही

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात आणि तीन टप्प्यामध्ये देण्यात येतात. त्याच अनुशंगाने पीएम किसान मानधन योजनाही आहे. यामध्ये शेतकऱ्याला मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यासाठी महत्वपूर्ण माहीती, तर मिळेल मासिक पेन्शनही
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 6:23 PM

मुंबई : देशातील 10 कोटीहून अधिक शेतकरी हे (PM Kisan Yojna) पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जात आहेत. ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना असली तरी यापलिकेडे जाऊन आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत ती पीएम किसान मानधन योजनेची.. अनेक शेतकरी (Farmer) यामध्ये सहभागी असतीलही मात्र, ज्यांना नव्याने सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना यातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एका वर्षात आणि तीन टप्प्यामध्ये देण्यात येतात. त्याच अनुशंगाने पीएम किसान मानधन योजनाही आहे. यामध्ये शेतकऱ्याला मासिक पेन्शनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीएम किसान योजनेचा लाभार्थी असलेल्या खातेदार शेतकऱ्याला पीएम किसान मानधन योजनेचा मान मिळणार आहे. या माध्यमातून मासिक पेन्शनचीही सुविधा मिळणार आहे. जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असताल तर कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवू शकणार आहात.

काय असणार आहेत अटी

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यातून एकदा दोन हजार रुपये हे खातेदार शेतकऱ्याला देऊन केंद्र सरकार सन्मान करी आहे. याशिवाय पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन ची तरतूद आहे. याकरिता कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्षाचे कोणतेही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ होईल.

असे आहे योजनेचे स्वरुप

शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रतिमहिना ज्या प्रमाणात गुंतवणुक केली जाईल त्यानुसार वयाच्या 60 वर्षानंतर किमान तीन हजार रुपये किंवा वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळेल. यासाठी प्रतिमहिना गुंतवणूक पंचावन्न रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. पी एम किसान योजनेचे खातेदार जर पीएम किसान मानधन योजना सहभागी झाले त्यांची नोंदणी सहज होते. शिवाय पेन्शन योजनेमध्ये भरावे लागणारे पैसे हे तुमच्या खिशातून गुंतवावे लागत नाही तर ते एम किसान सन्मान निधी च्या योजनेच्या खात्यामधून कपात होतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा 55 आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये गुंतवावे लागतात. (Pm Kisan Yojana beneficiaries to get monthly pension)

संबंधित बातम्या :

लातूर मार्केट : उडीदाच्या दरात पुन्हा वाढ, सोयाबीनचे दर स्थिर

केंद्र सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान : कृषिमंत्री दादा भुसे

उस्मानाबाद : खरीप उत्पादनाच्या आशा संपुष्टात, प्रकल्पातील पाणीही शेतातच

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.