AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विज तोडणीचा ‘शॅाक’ शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन

वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

विज तोडणीचा 'शॅाक' शेतकऱ्यांना नाही परवडणार, सांगलीत मोर्चा तर औरंगाबादमध्ये आयुक्तांना निवेदन
कृषीपंपाचा विद्युत पुरवठी खंडीत करु नये या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने औरंगाबाद विभागीय आयुक्त यांना देण्यात आले
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 3:41 PM
Share

लातूर : वाढत्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने आता धडक वसुली मोहिम सुरु केली आहे. कृषीपंपधारकांना तर 24 नोव्हेंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. आता थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. सांगली येथे विज कनेक्शन तोडणी बंद झालीच पाहिजे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या देण्यात आला होता. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

महावितरणची सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप धारक ग्राहकांकडे आहे. नियमित बिल अदा केले जात नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे. आता महावितरण कंपनीने मध्यंतरी थकबाकी अदा करण्याचे अवाहन केले होते. तर आता 24 नोव्हेंबरपासून थेट विद्युत पुरवठाच खंडीत केला जात आहे. या करवाईमुळे आता रोष व्यक्त होऊ लागला आहे,

ऐन रब्बीच्या तोंडावरच वसुली मोहिम

शेतकरी हे महावितरणचे थकीत बील अदा करीत नाहीत. किमान आता रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या गरजेपोटी तरी विजबिल अदा करतील यामुळे ऐन रब्बी हंगामातच महावितरणकडून वसुली आणि कारवाईची केली जात असते. यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठाही आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे थेट विजतोडणीची कारवाई करु नये यासाठी शेतकरी संघटना पुढे येत आहेत.

सांगलीत महावितरणच्या कार्यांलयासमोरच ठिय्या

ऐन रब्बी हंगामातच विजतोडणी का याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. महावितरणच्या परिसरात मोर्चा दाखल होताच पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर मात्र, संतप्त आंदोलकांनी थेट महावितरणचे कार्यालय उघडूनच कार्यालयातच ठिय्या दिला होता. शिवाय कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करु नये अशी मागणी केली.

औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्तांना मनसेचे निवेदन

मराठवाड्यातही महावितरणची वसुली मोहिम सुरु आहे. लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात थकबाकीदारांच्या कृषीपंपाचा विद्युत पुरवठी मध्यंतरी खंडीत करण्यात आला होता. यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सक्तीची विज वसुली थांबवावी आणि विद्युत पुरवठाही खंडीत करु नये अशा मागणीचे निवेदन मनसेचे दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी विभागीय आयुक्त यांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

पेरलं तरच उगवेन..आगामी खरिपासाठी कशी राबवली जातेय बीजोत्पादन प्रक्रिया, शेतकऱ्यांचा सहभागही महत्वाचा

सोयाबीनच्या दरही वाढले अन् आवकही, 7 हजाराकडे वाटचाल

…अखेर कृषी आयुक्तांचे भाकित खरे ठरले, काय होते केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.