नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीचा ‘ठसका’ ; तीन दिवसांमध्ये 15 हजार क्विंटलची आवक
यंदा पावसामुळे सर्वच पिकांची दाणादाण उडाली असली तरी मात्र, नंदुरबार आणि लगतच्या जिल्ह्यातील मिरची तरली आहे. उन्हाळ्यात लागवड करण्यात आलेल्या मिरचीचा ठसका आता नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार उठत आहे. कारण गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल 15 हजार क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे.
जितेंद्र बैसाणे नंदुरबार : यंदा पावसामुळे सर्वच पिकांची दाणादाण उडाली असली तरी मात्र, (Nandurbar) नंदुरबार आणि लगतच्या जिल्ह्यातील मिरची तरली आहे. उन्हाळ्यात लागवड करण्यात आलेल्या मिरचीचा ठसका आता नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार उडत आहे. कारण (record arrival of chillies,) गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल 15 हजार क्विंटल मिरचीची आवक झालेली आहे. त्यामुळे इतर पिकांमधून यंदा नुकसान झाले असले तरी मिरची मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु आणणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. मिरचीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती केवळ लगतच्या जिल्ह्यासाठीच नाही परराज्यातूनही व्यापारी हे खरेदीसाठी येतात.
यंदा पोषक वातावरणामुळे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी पोषक हवामान असल्यामुळे मिरचीची आवक वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार मे महिन्यापासून शेतकऱ्यांकडून मिरचीची लागवड करण्यात आली होती. यंदा सरासरी पावसातही झाडांची स्थिती चांगली राहिल्याने फळधारणा झाली होती. गेल्या महिन्यापासून हिरव्या मिरचीची तोडणी सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यापासून लाल मिरचीचे येऊ लागल्याने बाजार समितीमध्ये दर दिवशी मिरचीची आवक वाढत आहे.
तीन दिवसात पंधरा हजार क्विंटल मिरचीची खरेदी विक्री झाली
नंदुरबार जिल्ह्यात साधाराण: मे महिन्यामध्ये मिरचीची लागवड केली जाते. लागवडीपासून जोपासण्याचे योग्य नियोजन शेतकरी करतात. शिवाय दरवर्षी मिरचीची लागवड केल्याने खत, पाण्याचे नियोजन याचा अंदाज शेतकऱ्यांना आलेला आहे. यंदा मात्र, पावसामुळे उत्पादनात घट होणार अशी भिती होती. मात्र, यंदा उत्पादनात वाढ झालेली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल 15 हजार क्विंटल मिरचीची आवक बाजारपेठेमध्ये झालेली आहे. त्यामुळे नजर जाईल तिथपर्यंत मिरचीचे वाळवण दिसत आहे.
आवकही वाढली अन् दरही
आवक वाढली की दर घसरणार हे बाजाराचे तसे सुत्र आहे. पण मिरचीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. ज्याप्रमाणात आवक आहे त्याहून अधिक मागणी ही नंदुरबारच्या बाजारपेठेत असते. नंदुरबारची बाजारपेठ ही केवळ लगतच्या जिल्ह्यांमध्येच नाही तर परराज्यातही प्रसिध्द आहे. त्यामुळेच मिरची खरेदी करण्यासाठी गुजरात, मध्यप्रदेश येथील व्यापारी हे तळ ठोकून असतात. यंदा केवळ पोषक वातावरण असल्याने ही किमया झाली आहे. शिवाय ही तर हंगामाची सुरवात असून आगामी काळात अजून आवक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
यंदाही दर वाढण्याची शक्यता
आता मिरचीची आवक होण्यास सुरवात झाली आहे. शिवाय चांगल्या दर्जाचा माल अजूनही बाजारपेठेत आलेला नाही. मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी मागणीही त्याच प्रमाणात असते. शिवाय मिरचीसाठी हा भाग सुपिक मानला जातो. गतवर्षी 2 हजारापासून ते 3 हजार 500 रुपये क्विंटलला दर मिळालेला होता. यंदाही त्यापेक्षा अधिकचा दर मिळेल अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने व्यक्त करण्याात आला आहे. सध्या 1 हजार 500 ते 3 हजाराचा तर मिळत आहे.
लागवड क्षेत्रही वाढले
दरवर्षी मिरचीमधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते. त्यामुळे यंदा पोषक वातावरण असल्याने मिरचीच्या क्षेत्रामध्येही वाढ झालेली आहे. गतवर्षी जिल्ह्यात 6 हजार हेक्टरावर लागवड करण्यात आली होती तर यंदा 9 हजार हेक्टरावर लागवड करण्यात आली आहे. (Record arrival of chillies in Nandurbar Market Committee, farmers get better rates)
संबंधित बातम्या :
रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा..!
महिला शेतकरी गट होणार ‘आत्मनिर्भर’, कृषी महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम
विम्यासाठी फळबागायत दार ‘वेटिंगवर’ या पर्यायांची अमलबजावणी करा अन् परतावा मिळवा