AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!

अखेर ज्याची भीती होती तेच कांद्याच्या दरात पाहवयास मिळत आहे. कांद्याच्या दराचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. गेल्या 3 महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर हे घसरलेले नव्हते. मात्र, आता परस्थिती बदलत आहे. कारण चाकण बाजार समितीमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये प्रतिकिलो कांद्याच्या दरात तब्बल 14 रुपयांची घट झाली आहे.

Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!
खरीप आणि उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक वाढल्याने दर घसरत आहेत.
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 9:36 AM
Share

पिंपरी चिंचवड : अखेर ज्याची भीती होती तेच (Onion Rate) कांद्याच्या दरात पाहवयास मिळत आहे. कांद्याच्या दराचा लहरीपणा काय असतो याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. गेल्या 3 महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर हे घसरलेले नव्हते. मात्र, आता परस्थिती बदलत आहे. कारण (Chakan Market) चाकण बाजार समितीमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये प्रतिकिलो कांद्याच्या दरात तब्बल 14 रुपयांची घट झाली आहे. तर गुरुवारी 10 ते 13 रुपये प्रतिकिलोमागे घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या खरिपातील लाल आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामातील (Onion Arrival) कांद्याची आवक सुरु झाल्याने हा परिणाम दिसून येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय भविष्यात यापेक्षा वेगळे चित्र राहणार असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

दोन्ही हंगामातील आवक एकाच वेळी

राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक ही दुपटीने वाढली आहे. यामध्ये लासलगाव, सोलापूर या बाजार समित्यांचा समावेश होतो तर आता चाकण बाजार समितीमध्येही अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. जानेवारी महिन्यात केवळ लाल म्हणजेच खरिपातील कांद्याची आवक सुरु होती. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाळी कांद्याचीही आवक सुरु झाली आहे. असे असले वाढत्या मागणीमुळे दर टिकून होते पण गेल्या 10 दिवसांपासून चित्र हे बदलत आहे. मागणी घटल्याने कांदा दरात मोठी घसरण पाहवयास मिळत आहे.

10 दिवसांमध्ये 15 रुपयांची घट

कांद्याचे दर हे रात्रीतून बदलतात असे म्हणले जाते पण याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. कांदा छाटणी सुरु असताना असलेला दर मार्केटला कांदा दाखल होईपर्यंत टिकून राहिल का नाही अशी परस्थिती आहे. 5 मार्चला चाकण बाजारपेठेत 27 रुपये प्रति किलो इतका दर होता. गेल्या दहा दिवसांत थेट 15 रुपयांनी दर खालावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. शिवाय आता कुठे उन्हाळी हंगामातील कांदा आवकला सुरवात झाली आहे. येथून पुढे आवक ही वाढतच राहणार आहे. त्यामुळे भविष्यात कांदा दराची अवस्था काय होईल हे सांगता येत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

मजुरांअभावी कांदा मार्केट परिसरातच

कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने त्याचे व्यवस्थापनही महत्वाचे आहे. मात्र, सध्या होळी सणामुळे परप्रांतीय मजूर हे गावी परतले आहेत. त्यामुळे मजूरांची संख्या ही निम्म्याने घटली असल्याने कांद्याची पोती लोडिंग-अनलोडिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा बाजार समितीत पडून राहत आहे. वाढलेली आवक आणि घटलेली मागणी हेच या दर घसरणीचे कारण आहे.

ग्राफिक्स कांद्याचे दर

16 मार्च 10 ते 13 रु किलो

12 मार्च 15 ते 20 रु किलो

09 मार्च 17 ते 22 रु किलो

05 मार्च 22 ते 27 रु किलो

संबंधित बातम्या :

Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?

Video: 50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं, संभ्रम दूर करणारा व्हिडीओ पाहिला का?

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला पुन्हा घरघर, सरकारचा हस्तक्षेपानंतरच मिळणार नवसंजीवनी..!

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.